scorecardresearch

Premium

नवी मुंबई: वाशी कोपरी सिग्नल…बनलाय चक्का जाम सिग्नल

वाहतूक पोलिसांनी या सिग्नलच्या ठिकाणी रम्बलर तसेच मार्गिका साठी रबरचे खांबे उभे केले आहेत.परंतु या कोपरी चौकात गाड्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहनचालक रबरी खांबांच्या मर्गिकेच्या बाहेर गाड्या उभ्या करतात.

day by day problem of parking navi mumbai city getting more serious huge traffic jam vashi kopri Signal
नवी मुंबई: वाशी कोपरी सिग्नल…बनलाय चक्का जाम सिग्नल

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न अधिक जटील होत चालला नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात अनियोजित पार्किंगचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न अधिक जटील होत आहे.नवी मुंबईतील कोपरी सिग्नल हा चक्का जाम सिग्नल बनला आहे. केव्हाही या सिग्नल परिसरात गेलात तर तुम्हाला हमकास वाहतूकोंडीला सामोरे जावे लागते कोपरी सिग्नलच्या आधी वाशिकडील तसेच ठाणे बेलापूर मार्गावरून येणाऱ्या गाड्यांची गर्दी कोपरी सिग्नल येथे सतत पाहायला मिळते.

वाहतूक पोलिसांनी या सिग्नलच्या ठिकाणी रम्बलर तसेच मार्गिका साठी रबरचे खांबे उभे केले आहेत.परंतु या कोपरी चौकात गाड्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहनचालक रबरी खांबांच्या मर्गिकेच्या बाहेर गाड्या उभ्या करतात.त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोपरी पुलाच्या दोन्ही बाजूला कायम असते.तसेच याच कोपरी सिग्नल पासून आरेंजा कॉर्नर पर्यंत गाड्यांची दुतर्फा पार्किंग असते. शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा प्रश्न पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

Citizens of Dombivli suffering because of bad roads Excavation of roads for laying of new roads and channels
खराब रस्त्यांमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; नवीन रस्ते, वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदाई
part of commercial building obstructing widening of the road was demolished mumbai municipal corporation
रस्ता रुंदीकरणाआड आलेल्या व्यावसायिक इमारतीचा काही भाग तोडला, पश्चिम उपनगरात प्रथमच केला पालिकेने प्रयोग
Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
Traffic jam due to two buses stoped working at 50 feet
नवी मुंबई : ५० फुटांवर दोन बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी 

हेही वाचा: उरण तालुक्यातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई शहरात वाशी ते कोपरी पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला असून बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शनिवार व रविवारी तर सतरा प्लाझा समोरील बेकायदा पार्किंगवर तात्पुरती कारवाई केली जाते.परंतू वारंवार कारवाई करुनही पार्किंगचा प्रश्न सर्वच ठिकाणी जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.शहराअंतर्गत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे.कार्यालयीन वेळाबरोबरच संध्याकाळच्यावेळीही घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना पार्किंग करायचे तरी कुठे असा प्रश्न सातत्याने पडत आहे. बेलापूर ते दिघा प्रत्येक विभागात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.पार्किंग जागांपेक्षा गाड्या जास्त असे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : ४ दशकांपासून प्रलंबित प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न निकाली, दरही कमी केले

नवी मुंबईचा क्विन नेकलेस असलेल्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतू याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते.या उपनगराच्या पहिल्याच आरेंजा सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते. येथील पार्किंगचा प्रश्न जैसे थे आहे.शहरात वाहतूक विभागामार्फत बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जाते.परंतू त्यांनाही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. सिडकोकडून पालिकेला पार्किंगसाठी मिळणाऱे भूखंड अद्याप लालफितीतच अडकले आहे. त्यामुळे शहरात पार्किंगबाबत ठोस उपाययोजना न झाल्यास नियोजित नवी मुंबई शहरात पार्किंग धोरणाचे तीन तेरा वाजतच राहणार असे चित्र आहे.शहरात खाजगी आस्थापना पार्किंगबाबत हात वरत असल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे.

वाहतूक विभागाच्या कारवाईची धास्ती झाली कमी….

नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगबाबत वाहतूक विभागाद्वारे कारवाई करण्यात येते पण वाहनांची संख्या व संबंधित स्थानिक आस्थापनांनी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गाडी लावायला जागाच नसते. त्यामुळे जागा मिळेल तिथे पार्किंग केले जाते.

नवी मुंबईत वाहतूकोंडीमुळे वाहन चालवणे कठीण होत आहे.आगामी काळात दुचाकी,चारचाकी वाहन घराबाहेर घेवून जायचे की नाही असा प्रश्न पडतो. – रुपेश शर्मा,वाशी

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Day by day problem of parking navi mumbai city getting more serious huge traffic jam vashi kopri signal tmb 01

First published on: 11-12-2022 at 15:16 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×