scorecardresearch

रायगड : विमला तलावात आढळले मृत मासे

हे मासे त्वरित तलावातून हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रायगड : विमला तलावात आढळले मृत मासे
रायगड : विमला तलावात आढळले मृत मासे (image – लोकसत्ता टीम)

उरण शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या विमला तलावात शुक्रवारी मासे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे या माशांची परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. हे मासे त्वरित तलावातून हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : हायकोर्टाचे सिडको, पालिका, नगरविकास विभाग, मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शनला आपले म्हणने ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश!

हेही वाचा – महाराष्ट्राच्या दिल्लीतील चित्ररथात ‘साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर’

विमला तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. या माशांना पाहण्यासाठी येथील नागरिकांकडून पावाचे तुकडे पाण्यात टाकले जातात. ते खाण्यासाठी मासे पाण्याबाहेर येतात. यामध्ये मासे हे पाव पूर्ण खात नसल्याने ते तलावातील पाण्यावर तरंगत असतात. हे पाव खाऊनच मासे मेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या मेलेल्या माशामुळे तलावातील पाणी दूषित होऊ नये यासाठी ते त्वरित साफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 12:27 IST

संबंधित बातम्या