scorecardresearch

Premium

भाज्या वधारल्या! पाऊस लांबल्याने आवक घटली, परिणामी दरात २० ते ३० टक्के वाढ

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात २०% ते ३०% वाढ झाली आहे.

vegetable
भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याने बाजारात भाज्यांची आवक घटते. त्याचबरोबर आता पाऊस लांबल्याने ही भाज्या वधारल्या आहेत. भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

pune vegetable price marathi news, vegetable price pune marathi news
पुणे : उन्हाचा चटका वाढला, भाज्या किती झाल्या महाग ?
Kitchen Jugaad Video
Jugaad Video: बाजारातून पालेभाज्या घरी आणल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
pune vegetable prices marathi news, vegetable price pune marathi news, potato price pune marathi news
पुणे : बटाट्याच्या दरांत वाढ; फ्लाॅवर, शेवगा स्वस्त
farmer injured in leopard attack in buldhana
बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी; आरडाओरड केल्याने वाचले प्राण

एपीएमसी बाजारात नित्याने ५५०ते ६०० गाड्या आवक होते. मंगळवारी बाजारात ५३९ गाड्या दाखल झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये टोमॅटो अधिक स्वस्त होते, परंतू आता टोमॅटोचे उत्पादन कमी होत असून टोमॅटोच्या दरात प्रतकिलो १२-१८ रुपयांनी दरवाढ झाली आहे. मध्यंतरीच्या कालावधीत टोमॅटोचे दर गडगडले होते, त्यामुळे कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एपीएमसीत टोमॅटो आवक घटली आहे.

आणखी वाचा-नवी मुंबईत गढूळ पाण्यावरुन संताप , पालिकेने नागरिकांना पाणी स्वच्छ करण्याचे फिल्टर वाटावेत

मंगळवारी बाजारात २८८७ क्विंटल आवक झाली असून प्रतिकिलो २० ते ३२रुपयांनी उपलब्ध असून किरकोळ बाजारात ५०ते ६०रुपयांनी विक्री होत आहे. घाऊकमध्ये प्रतिकिलो गवार, भेंडी ,हिरवी मिरची ,शिमला मिरची, ४०-४५ रू, फ्लॉवर ११-१२रु, वांगी ३०-३२रु, अद्रक १८०रू, कोथिंबीर १५-२०रुपये जुडी तर मेथी १०-१५रू जुडी दराने विक्री होत आहे. पाऊस लांबल्याने उत्पादन कमी झाले आहे , त्यामुळे भाज्यांची दरवाढ होत आहे असे मत व्यापारी संजय फुलसुंदर यांनी व्यक्त केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decline in arrivals has led to a 20 to 30 percent increase in vegetable prices mrj

First published on: 13-06-2023 at 15:23 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×