सीवूड्स सेक्टर ४८ येथे पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासमोरच असलेल्या भूखंड क्रमांक २९ येथे मागील ३ वर्षापासून बेकायदा सुरु असलेल्या आश्रमशाळेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने व सिडकोने संयुक्तरित्या कारवाई केली. परंतू भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी पालिका आयुक्त, सिडको यांच्याकडे तक्रार केल्यानंतरच सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चवर तोडक कारवाई करण्यात आली. परंतू नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्यासमोर बेकायदा बांधकाम करुन चर्च उभारण्याकडे नवी मुंबई व सिडको या सरकारी आस्थापनांनीच दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शहरात बेलापूर ते दिघा पर्यंत सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांना पालिका अधिकारीच व त्यांचा अतिक्रमण विभागच जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील बेकायदा बांधकामाचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामावर टाच येणार?

सीवूड्स येथील पालिकेच्या सीवूड्स येथील नागरी आरोग्यकेंद्राच्या अगदी बरोबर समोरच बेकायदा संस्था उभी राहते. परंतू करोनाच्या काळात सातत्याने नागरी आरोग्य केंद्र व पालिकेची वैद्यकीय सुविधा २४ तास कार्यरत असताना पालिकेच्या अतिक्रमण विभागातील हे बांधकाम दिसले नाही का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच या संस्थेत ठेवण्यात आलेल्या मुलीवर अन्याय झाल्याचे जिल्हा महिला बाल विकास विभागाने निदर्शनास आणून दिले तसेच त्यानंतर महिन्यापेक्षा अदिक काळ उलटल्यानंतरही अशा बेकायदा बांधकामामकडे पालिका अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष का केले. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे व मनमानीपणामुळेच शहरातील अतिक्रणम बोकाळत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा या क्षेत्रात मूळ गावठाणे तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरु असून बेकायदा इमारती उभ्या राहील्यानंतरही पालिकेच्या विभाग अधिकारी ,नगररचना विभाग, अतिक्रमण अधिकारी यांनी काहीच माहिती नसते का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागात कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्याच गळ्यात अतिक्रमण विभागाची वारंवार जबाबदारी देण्यामागे नक्की कोणत्या लक्ष्मीचे पाणी मुरते असा प्रश्न विचारला जाते. शहरात सामान्य नागरीक तसेच सामाजिक कार्यकर्ते व कोणीही पालिकेकेडे अतिक्रमणाबाबत तक्रार केल्यानंतर विभाग अधिकारी कार्यवाही करण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या प्रयत्नांना कोणाच्या दबावामुळे कार्यवाही करणे शक्य होत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीवूड्स चर्चमधील प्रकारानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आवाज उठवल्यानंतरच तात्काळ कशी काय कारवाई झाली असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणांना पालिका अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे.

हेही वाचा- उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान

सीवूड्स सेक्टर ४८ मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असल्याने ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाने बेकायदा चर्चमध्ये ठेवण्यात आलेल्या ३ ते १८ वयोगटातील मुलांची सुटका करुन या मुला मुलींच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या सर्वांची उल्हासनगर व नेरुळ येथील बालगृहात रवानगी केली होती. सदर आश्रम शाळेत अस्वच्छ व गलिच्छ वातावरण असल्याचे तसेच त्याठिकाणी बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टी नसल्याचे चौकशीत आढळुन आल्याने सदरची कारवाई करण्यात आली होती.

सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बालकांसाठी चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेत मुला मुलींना अस्वच्छ व गलिच्छ वातावरणात ठेवण्यात येऊन अत्यंत अपुऱ्या जागेत हा सगळा प्रकार सुरु असून या मुलांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. परंतू दररोज नागरी आरोग्य केंद्रात पालिकेचे कर्मचारी येतात तसेच पालिकेचे अतिक्रमण अधिकारी व विभाग अधिकारी यांना का ही गोष्ट दिसली नाही का जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांच्या दबावाखाली करण्यात आली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात संपूर्ण नवी मुंबईतील अतिक्रमण करण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वतः घेऊन अतिक्रमण विभागात सुरु असलेल्या अंदागोंदी कारभाराला आळा बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत दीड लाखांची ई-सिगारेट पोलिसांकडून जप्त; बंदी असूनही मागणीत वाढ

शहरातील अतिक्रमणांना पालिका अधिकारीच जबाबदार…….

नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी असलेल्या अतिक्रणांना पालिका अधिकारीच जबाबदार आहेत. सामान्य नागरीकाने तक्रार केल्यानंतर त्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. पालिकेने व पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे असताना पालिका अधिकारीच कारवाई करत नाही. त्यांना आर्थिक मलिदा प्राप्त झाल्याशिवाय कारवाई होत नाही.अधिकारी व शासकीय यंत्रणा फक्त कागदी घोडे नाचवते, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deliberate neglect of the municipal authorities to take action on illegal constructions in navi mumbai dpj
First published on: 06-12-2022 at 20:20 IST