ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने हळूवारपणे पैशांची मागणी करून गंडवण्याचे प्रकार नित्याची बाब झाली आहे. मात्र, थेट आयुक्तांच्या नावानेच पैसे उकलण्याचा प्रकार पहिल्यांदा समोर आला असून नवी मुंबईतील एका माजी नगरसेविकेला स्वतः नवी मुंबई मनपा आयुक्त असल्याचे भासवत व्हॉट्सअपवर पैशांची मागणी करण्यात आली. पैशांची मागणी करणाऱ्याने गुगल पे ची एक लिंकही यासाठी पाठवली आहे. मात्र, वेळीच हा संदेश फेक असल्याचा संशय आल्याने पैसे वाचले.

हेही वाचा- उरण: नौदलाच्या तुणीर डोंगराला आग,अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश

नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात वैशाली तुकाराम नाईक राहत असून त्या माजी नगरसेविका आहेत. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचा संदेश आला त्यानुसार त्यांनी सुरवातीला जुजबी चौकशी केली. नाईक यांनी काही दिवसापूर्वी प्रभागातील समस्येबाबत निवेदन दिले होते. आयुक्त कदाचित त्याच संदर्भात संदेश पाठवत असतील असे नाईक यांना वाटले. मात्र, काही वेळाने त्यांनी तुम्ही  गुगल पे शी संलग्न आहात काय? अशी विचारणा केली नाईक यांनी होकार दिल्यावर त्यांनी एक लिंक पाठवली व ५ हजार रुपये पाठवण्याची विनंती केली. आयुक्त ५ हजार रुपये पाठवण्यास सांगतात? असा प्रश्न नाईक यांना पडला. त्यामुळे त्यांनी उत्तर देणे बंद केले.

हेही वाचा- उरण : जेएनपीटी बंदरातून कोट्यवधीच्या प्राण्यांची कातडी व दुर्मिळ चित्रांची तस्करी

याबाबत त्यांनी कुटुंबातील काही व्यक्तींशी चर्चा केली व आयुक्त राजेश नार्वेकर यांचा क्रमांकही मिळवला. नार्वेकर यांच्या नावाने चँटिंग केलेला क्रमांक आणि परिचित व्यक्तीकडून मागवलेला क्रमांक वेगवेगळा होता. तसेच हा बनावट संदेश असल्याची खात्री  नाईक यांना झाली. अन्यता लिंकवर पैसे पाठवले असता आपल्या खात्यातून पटापट पैसे परस्पर उचलले जात असल्याचे प्रकार घडल्याच्या बातम्या वाचनात असल्याने त्यामुळे पैसे वाचले. हा प्रकार मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कानावर टाकून पैसे मागणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे अशी माहिती नाईक यांनी दिली. या विषयी विचारणा करण्यासाठी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.

मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याबरोबर असाच प्रकार काही दिवसांपूर्वी झाला होता. त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतीत माहिती घेऊन कायदेशीर पाऊले उचलले जातील.