सध्या उन्ह- पाऊस सुरू असून हवामानात वारंवार बदल होत आहेत. परिणामी नवी मुंबईत साथीचे आजार बळावत आहेत. त्यामुळे नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू या आजारांनी देखील डोके वर काढले आहे. जानेवारी पासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे १०रुग्ण, मलेरियाचे ६० तर स्वाईन फ्ल्यूच्या ४१ रुग्णांची नोंद महापालिकेकडे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- वाशी खाडीवरील वाहतूककोंडी सोडविणाऱ्या बहुचर्चित तिसऱ्या पुलासाठी २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

सन २०२०-२१ कालावधीत करोनाने डोके वर काढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृकता निर्माण झाली होती. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भर देण्यात येत होते. त्यामुळे नवी मुंबई शहरात करोना व्यतिरिक्त साथीचे आजार रुग्ण कमी झाले होते. परंतु मागील वर्षीपासून पुन्हा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मागील वर्षी खासगी बांधकाम कंपनी, तुर्भे, गावठाण, झोपडपट्टी विभाग, सिडको वसाहतीतील घरे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांची पैदास आढळली होती. यावर्षी ही हवामानात होणाऱ्या बदलामुळे नवी मुंबई शहरात सध्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. सध्या आजारांवर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सन २०२१ मध्ये डेंग्यूचे ८ रुग्ण तर मलेरियाचे ४४ रुग्ण होते. तर सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ६०रुग्ण तर डेंग्युचे १० रुग्ण झाले आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : शहरात ४०,४७२ घरे पाणीमीटरच्या कक्षेत आल्याने १ कोटी वसुली वाढणार !

शहरात २९६ ठिकाणी डेंग्यू डास उत्पत्ती

नवी मुंबई महापालिकेने ७७८२ ठिकाणी भेटी दिल्या आहेत. या डास उत्पत्ती शोध मोहिमेत शहरातील २९७ ठिकाणी डेंग्यू डासांची पैदास आढळली आहे. ६४८३ घरांमध्ये औषध फवारणी तर ७३३२ घरांत धुरफवारणी केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue malaria patients increase in navi mumbai dpj
First published on: 23-09-2022 at 11:34 IST