कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांना लक्ष्य केलं आहे. “अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण फूस लावतंय याची चौकशी सुरू झाली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्याकरता गेले होते. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणतात मला माहितेय येथे दंगल घडणार आहे. काही वळाने औरंगजेब आणि टिपू सुलतान याचं उदात्तीकरण करतात. त्यानंतर एक प्रतिक्रिया येते. या विधानाचा आणि घटनांचा संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फूस लावतंय? कोण यांना उदात्तीकरण करण्याकरता सांगतंय? याची देखील चौकशी करतोय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा >> आक्षेपार्ह स्टेटस लावण्याने कोल्हापुरात तणाव, दगडफेकीचे प्रकार; उद्या कोल्हापूर बंदचे आवाहन

औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग असू शकत नाही

“काही गोष्टी आम्हाला समजत आहेत. पण सर्व चौकशी झाल्यानंतर सर्व गोष्टी सांगेन. अचानकपणे अशाप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतनाचं उदात्तीकरण सुरू होणं हा काही योगायोग नाही. त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्या खोलात जावंच लागेल”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्वजण एकाच सुरात कसे बोलतात?

“या सर्व प्रकरणात सरकारने लक्ष घातलं पाहिजे”, असं शरद पवार आज म्हणाले. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मला हे स्पष्टपणे दिसायला लागलंय की हे सर्व एका भाषेत बोलत आहेत. एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहेत. आता इथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर ती का होतेय? तर औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करताहेत म्हणून होते. आम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यांचे काही नेते औरंजेबाला देशभक्त ठरवायला निघाले आहेत. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहितेय. सर्व एकाचवेळी एका सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची चौकशी करायलाच पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Story img Loader