scorecardresearch

उरण शहरातील कोंडीचा गणेशमूर्ती नेतानाही फटका; उत्सव काळात शहरातील कोंडीत वाढ ,नियोजनाचा अभाव

वाहतूक कोंडीचे नियोजन करण्याची जबाबदारी उरण नगरपरिषद व वाहतूक विभागाची असतानाही ती दिसत नसल्याने कोंडीत अधिकची भर पडली आहे.

devotees carrying ganesha idols on two wheelers affected by the traffic jam in uran city
उरण शहरातील वाहतूक कोंडी

उरण : सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू असून मंगळवार पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. त्यातच गणेशमूर्ती ही घरी नेण्यासाठी भक्त बाजारात आले आहेत. याच गर्दीत दुचाकीवरून गणेशमूर्ती नेणाऱ्या भक्तांनाही शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसू लागला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ अंतर्गत सफाईमित्रांनी जल्लोषात फोडली स्वच्छतेची इकोफ्रेंडली दहीहंडी

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

उत्सवात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्याची जबाबदारी उरण नगरपरिषद व वाहतूक विभागाची असतानाही ती दिसत नसल्याने कोंडीत अधिकची भर पडली आहे. उरण शहरातील रस्ते हे अरुंद आहेत. अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर परिघाच्या कक्षेत वसलेल्या या शहरात वाहनतळाचा अभाव आहे. त्याचप्रमाणे दिवसागणिक वाढणारे फेरीवाले आणि वाढती वाहनांची संख्या यांचीही भर पडत आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी बेशिस्त वाहन पार्किंग या वाहनांवर न होणारी कारवाई या सर्व समस्यांमुळे कोंडीत अधिकची वाढ झाली आहे. त्यामुळे उरण नगरपरिषद व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवून किमान उत्सवाच्या काळात तरी शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 14:18 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×