scorecardresearch

उरण: रखडलेले करंजा मच्छीमार बंदर नव्या वर्षात कार्यान्वित होणार; मेरिटाईम बोर्डाकडून पुन्हा नवा मुहूर्त

करंजा बंदर हे रायगड व कोकणातील मच्छिमारांसाठी वरदान ठरणार आहे.

उरण: रखडलेले करंजा मच्छीमार बंदर नव्या वर्षात कार्यान्वित होणार; मेरिटाईम बोर्डाकडून पुन्हा नवा मुहूर्त
उरण: रखडलेले करंजा मच्छीमार बंदर नव्या वर्षात कार्यान्वित होणार; मेरिटाईम बोर्डाकडून पुन्हा नवा मुहूर्त

करंजा बंदराचे काम मागील दहा वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने रखडत- रखडत सुरू आहे. मुंबईतील ससूनला पर्याय म्हणून एक हजार मच्छीमार बोटींच्या क्षमतेचे करंजा मच्छीमार बंदर उभारले जात आहे. या बंदराचे काम येत्या दोन महिन्यात म्हणजे नव्या वर्षात २०२३ मध्ये पूर्ण करून बंदर कार्यान्वित केले जाईल अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आली आहे. केंद्र-राज्य सरकारच्या निम्या-निम्या भागीदारीच्या फॉर्म्युल्यावर सुरू असलेल्या बंदराचे काम अपुऱ्या निधीअभावी अपूर्ण राहिले आहे. बंदर पूर्णत्वासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून आता फेब्रुवारी २०२३ चा नवा मुहूर्त ठरविण्यात आली आहे.

२०१२ ला करंजा बंदराचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ६४ कोटींवरुन १५० कोटींपर्यंत पोहचले आहे. वाढलेल्या अतिरिक्त खर्चाचा निधी शासनाकडून वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे निधीअभावी अद्ययावत करंजा बंदराचे काम सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत.बंदरात साचलेला गाळ काढणे, स्वच्छतागृह उभारणे,बंदराची जोडणाऱ्या रस्त्यांचे कामे अद्यापही झालेली नाहीत. वाढलेला निधी दोन्ही सरकार कडून मिळवून घेण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: नवी मुंबई : सानपाडा उड्डाणपुलाखाली लोखंडी जाळी बसवूनही अस्वच्छता कायम

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारण्यात येणाऱ्या एक हजार मच्छीमार बोटी लॅण्ड होण्याच्या क्षमता असलेले बंदर राज्यातील मच्छीमारांसाठी वरदान ठरणार आहेच.या मासेमारी बंदरामुळे परिसरातील २५ हजार नागरिक, व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचेही भाग्य उजळणार असल्याने या बंदराच्या तयार होण्याची प्रतीक्षा आहे. ६०० मीटर लांबीचे इंग्रजी ‘ ई ‘ आकाराचे बंदर, आधुनिक फिश लॅडिंग जेट्टी,वेस्टवॉटर ट्रिंटमेंट प्लाण्ट, रेडिओ अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सेंटर,फिश प्रोसेसर, शितगृह,मासळी लिलाव आणि विक्री केंद्र, डिझेल पंप, इत्यादी अत्याधुनिक सोयी-सुविधा मच्छीमारांससाठी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा: नवी मुंबई शहरातील ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण; २६ चौकांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण, तर यंदा ९ चौकांचे

मच्छिमार बंदराच्या गुणवत्तेवर आक्षेप

करंजा बंदर हे रायगड व कोकणातील मच्छिमारांसाठी वरदान ठरणार आहे.मात्र या बंदराच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी कोकण विभागीय फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे पुराव्यानिशी तक्रार करीत केली आहे.तसेच बंदराचे काम गुणवत्ता राखत काम करण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 14:54 IST

संबंधित बातम्या