देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो हे विचार आचरणात आणल्यास देशाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही असे उद्गार डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांनी श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टीब्रेवाला विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्या दरम्यान काढले,
श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टिब्रेवाला विद्यापीठाने श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा वाशी येथील प्रदर्शन केंद्रात रविवारी एका विशेष दिमाखदार कार्यक्रमात डॉक्टरेट ही पदवी बहाल करून त्यांचा सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री श्रीयुत आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी ,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा ,खासदार डॉक्टर पूनम महाजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विनोद टीब्रेवाला, तसेच विद्यापीठाचे संचालक मंडळ, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कुटूंबीय तसेच लाखो श्री सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा >>>“राहिले ते निष्ठावान मावळे, उडाले ते कावळे” उरणच्या शिवगर्जना अभियानात सुभाष देसाईंचे मत, म्हणाले…

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांची किंमत अनमोल आहे, यांच्या विचारांची व ज्ञानाची खरी युनिव्हर्सिटी रेवदंडा येथे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, तसेच विद्यापीठाने डॉक्टर श्री सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या पदवीचा मान सन्मान वाढल्याचं ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी संत वाङ्मयाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाला सुरुवात केली त्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं कार्य जगासमोर आलं म्हणूनच याच कार्याचा अनेक ठिकाणी गौरव होतोय त्यामुळे श्री सचिन दादा धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार हा श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याच्या भावना पद्मश्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांनी याप्रसंगी काढले.

हेही वाचा >>>नवी मुंबई: महिला आयपीएल मुळे वाहतुकीत बदल

आप्पासाहेब धर्माधिकारी हे ज्ञानाचा विद्यापीठ आहे, आणि आज आपल्याला मिळालेली डॉक्टरेट ही पदवी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यामुळे मिळाली. नानासाहेब धर्माधिकारी,अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचं श्री सचिन दादा धर्माधिकारी यांनी सांगत हा गौरव खऱ्या अर्थाने श्री सदस्यांचा असल्याचा ते आपल्या भाषणात म्हणाले.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या कार्याचा वसा अप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सचिन धर्माधिकारी चालवत आहेत त्यामुळे श्री सचिन धर्माधिकारी यांना ही पदवी बहाल करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू कुलपती विनोद टिब्रेवाला यांनी सांगितले. या कार्यक्रमाला श्री सदस्यांनी मोठी गर्दी केली होती.