नवी मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे गेली पाच वर्षे विशेष कार्य अधिकारी असलेले डॉ. राहुल गेठे हे पालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्यानंतर त्याला भाजपसह राष्ट्रवादीकडूनही विरोध करण्यात आला आहे. असे असताना गेठे यांच्यावर निवडणूक उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा पालिकेत आहे. मात्र गेठे अद्याप पालिकेत रुजू झालेले नाहीत.
नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरूपी अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्त अधिकारी असा वाद अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. करोना काळातही गेठे नवी मुंबई पालिकेत प्रतिनियुक्तीवर आले होते. मात्र त्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने त्यावर आक्षेप घेतल्याने त्यांना परत जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची शासनाने पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महापालिकेत उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर नियुक्ती कली आहे. याला भाजपसह राष्ट्रवादीकडूनही विरोध करण्यात आला आहे.
आगामी काळात पालिकेच्या निवडणुका होणार असून सध्या पालिकेतील निवडणूक उपायुक्त पदावर असलेले अमरीश पटनिगिरे यांच्याकडे परिमंडळ २, अतिक्रमण विभाग तसेच निवडणूक विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या निवडणूक विभागाची जबाबदारी गेठे यांच्याकडे दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.
डॉ. गेठे यांच्या प्रतिनियुक्तीचे शासनाने आदेश काढले आहेत. परंतु अद्याप ते पालिकेत रुजू झाले नाहीत. त्यामुळे ते पालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांना कोणत्या विभागाची जबाबदारी दिली जाणार हे निश्चित करण्यात येईल. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr gethe responsibility deputy election commissioner urban development minister eknath shinde special operations officer municipality amy
First published on: 18-05-2022 at 00:07 IST