scorecardresearch

क्रेन-कारच्या अपघातात कारचालक जखमी; शीव-पनवेल मार्गावर बेलपाडा येथील घटना

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनला कार धडकून झालेल्या अपघातात कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

नवी मुंबई : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनला कार धडकून झालेल्या अपघातात कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शीव-पनवेल मार्गावर बेलपाडा येथे घडली आहे. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
शीव-पनवेल मार्गावर खारघर वाहतूक पोलीस हद्दीत बेलपाडा येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या एका कडेला एक ट्रक क्रेन उभी होती गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा (एम एच ०२ सी आर २९०५) या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या क्रेनला जाऊन धडकली. या अपघातात गाडीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत केवळ चालक होता. त्याची ओळख पटलेली नाही.
या अपघातानंतर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, वाहतूक विभागाने तात्काळ पथकाला पाठवून अपघातग्रस्त गाडी रस्त्याच्या एका बाजूला नेली व वाहतूक नियमित केली. मात्र, वाहतूक नियमित होण्यास अर्ध्यातासाहून अधिक कालावधी लागला.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Driver injuredcrane car accident incident belpada on siva panvel road amy

ताज्या बातम्या