कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर एअरटेलची केबल टाकण्यासाठी रस्ते खोदकाम सुरू आहे. परंतु कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता आधीच अरुंद पडत असून ये-जा करणाऱ्या वाहनांना सायंकाळी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. आता या रस्त्याचे खोदकाम चालू असल्याने दिवसाही या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोपरखैरणे विभागात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यातच आता रस्त्यावर एअरटेलची केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना रस्ता अधिक तोकडा पडत आहे. आधीच या रस्त्यावर अवास्तव वाहन पार्किंग होत आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच रस्ते खोदून ठेवल्याने वाहन चालकांची चांगलीच कोंडी होत आहे. रस्ते खोदल्याने त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणी येत आहेत .

हेही वाचा: उरण: जासई उड्डाणपुलाचे आठ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्यास २०२३ उजाडणार

त्यामध्येच वाहन चालकांच्या अतिघाईने या रस्त्यावर वाहनांच्या दोन ते तीन रांगा लावलेल्या पहावयास मिळतात. त्यामुळे या दोन-तीन रांगांमधून वाट काढून वाहन चालकांना पुढे जावे लागते. त्यात रस्ता खोदल्याने सायंकाळच्या वेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. काही वेळा रिक्षा चालक वाहतुक कोंडीच्या डोकेदुखीने रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा नेण्यास सरळ नकार देतात. त्याचबरोबर आता दिवसाही या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

हेही वाचा: नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना पोलिसांकडून अटक

हा रस्ता रेल्वे स्थानकाला जोडला गेलेला आहे. त्याबरोबरच ठाणे- बेलापूर महामार्गावर जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे . त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते . कोपरखैरणे भुयारी मार्गातूनही ठाणे बेलापूर मार्गावरील गाड्या कोपरखैरणे मध्ये प्रवेश करतात . तसेच तीनटाकी कडून सरळ रस्त्याच्या दिशेनेही वाहनांची रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी मोठी गर्दी असते . मात्र याठिकाणी एकही सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहन चालक आढेवेढे वळण घेऊन रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे वाहतूक कोंडी मध्ये आणखीन भर पडत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to road works there is massive traffic jam outside koparkhairane railway station navi mumbai tmb 01
First published on: 28-11-2022 at 17:28 IST