उन्हाळ्यात एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांची मागणी अधिक असते, परंतु सध्या कडाक्याची थंडी पडली असल्याने रसाळ फळांची मागणी २० ते २५ टक्के रोडावली आहे. सध्या बाजारात अंजीर आणि स्ट्रॉबेरीची मागणी वाढली असून सफरचंद, मोसंबी-संत्रा, कलिंगडकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत कलिंगड, टरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी मोठ्या प्रारमाणात दाखल होत आहेत. ही फळे अधिक रसाळ असल्याने शरीराला अधिक थंडाव मिळतो. परंतु, कडाक्याची थंडी पडल्याने सर्वत्र थंड वातावरण आहे. त्यामुळे या फळांची मागणी घटली आहे. तर दुसरीकडे सध्या बाजारात अंजीर, स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे.

हेही वाचा – नवी मुंबईतील रिओ व रिया अडकले लग्न बंधनात; दोन श्वानांचा अनोखा विवाह

हेही वाचा – नवी मुंबई : स्वच्छता अभियानात देशात तिसरा राज्यात पहिला क्रमांकाचे शहर अद्याप हागणदारीमुक्त नाही; प्रशासन अनभिज्ञ

सध्या बाजारात कलिंगड ४२३० क्विंटल, सफरचंद ११५० क्विंटल, संत्री २६४९ क्विंटल, मोसंबी १८८५ क्विंटल, अंजीर ३३१ क्विंटल, स्ट्रॉबेरी ६२८ क्विंटल दाखल होत असून, स्ट्रॉबेरी प्रति किलो २००-३२० रुपये, तर इतर फळांचे दर ५०-१०० रुपयांनी घसरले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the cold the demand for juicy fruits in the navi mumbai apmc market decreased ssb
First published on: 25-01-2023 at 15:54 IST