रुग्णदुपटीचा कालावधी ३,१७६ दिवसांवर

१ एप्रिल रोजी नवी मुंबईत करोना रुग्णदुपटीचा कालावधी ८० दिवसांवर होता.

corona updates

दिवाळीनंतर नवीन रुग्ण संख्येत घट

नवी मुंबई : १ एप्रिल रोजी नवी मुंबईत करोना रुग्णदुपटीचा कालावधी ८० दिवसांवर होता. त्यानंतर परिस्थिती निवळत गेल्याने यात मोठी वाढ झाली असून तो ३,१७६ दिवसांवर गेला आहे. नवीन रुग्णसंख्येत घट होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.

नवी मुंबई करोनाचे नवे रुग्ण मागील दोन महिन्यांपासून प्रतिदिन सरासरी ५० पेक्षा कमी येत आहेत. तर दुसरीकडे करोनाची भीती कमी झाली आहे. लसीकरणाची संख्याही इतर महापालिकांच्या तुलनेत चांगली आहे. शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याने ७३५ दिवसांवर गेला होता. परंतु दुसऱ्या लाटेत झपाटय़ाने रुग्ण वाढल्याने रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला होता. शहरात मार्च-एप्रिलमध्ये रुग्णसंख्या सतत वाढत गेल्याने रुग्णदुपटीचा कालावधी फक्त ८० दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यावेळी शहरात दिवसाला १ हजारपेक्षा अधिक जण कोरानाबाधित आढळून येत होते. सध्या नवीन रुग्णांची संख्या दिवसाला २० च्या आत येऊ  लागली आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी आता ३,१७६ दिवसांवर गेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Duration double patient 3176 days ysh

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या