scorecardresearch

दसऱ्याच्या मुहूर्तावर किरकोळ बाजारात झेंडूचा दर १२० ते १५० रूपये किलो

आंब्याच्या पानाची तोरणं हि ३ ते ५० रुपयांनी विकली जात आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर किरकोळ बाजारात झेंडूचा दर १२० ते १५० रूपये किलो
दसऱ्याच्या मुहूर्तावर किरकोळ बाजारात झेंडूचा दर १२० ते १५० किलो

पनवेल : शहरातील महात्मा फुले बाजारामध्ये मंगळवारी फुल विक्रीसाठी फुल आणि तोरणांनी बाजार सजला होता. किरकोळ बाजारात झेंडूची विक्री प्रती किलो १२० रुपयांपासून सूरु होती. तर कोलकाता झेंडू १८० रुपयांनी विकला जात आहे. आंब्याच्या पानाची तोरण हे ३ ते ५० रुपयांनी विकले जात आहे.

प्रती अडीच फुट लांबीच्या पुढे तोरणाचे दर फुटामागे २० रुपयांनी वाढीव मागणी फुलविक्रेत्या महिलांकडून होत आहे. अनेक कारखान्यात व कार्यालयात मंगळवारीच पुजा होत असल्याने कामगारवर्ग मंगळवारी फुले व पुजा साहित्य खरेदीसाठी आल्याचे दिसले. बाजारात आंब्याच्या पानाची दहाळी १० रुपयांनी विक्री होत आहे. तसेच आपट्याच्या पानाची जुडी २० रुपयांना विक्री होत आहे

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या