मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. अवकाळी पावसामुळे ३०%-४०% कांदा भिजला असून त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात ७०% ते ८०% हलक्या प्रतीचा कांदा दाखल होत असून दर गडगडले आहेत. कांदा बटाटा घाऊक बाजारात कांदा प्रतिकिलो ५ते १० रुपये दराने विक्री होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी बाजारात सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात, त्यामुळे पावसाळ्या आधीच कांदे साठवणूकिला सुरुवात होते. कांद्याला चढे दर मिळतील या अपेक्षेने चाळीतील कांदा साठवणूकिला सुरुवात झाली आहे. मात्र यामध्ये सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याची साठवणूक केली जात आहे. सध्या बाजारात ७०% ते ८०% हलक्या प्रतीचा कांदा दाखल होत असून त्यातही अवकाळी पावसाने कांदे भिजल्याने ३०% ते ४०% कांदे खराब होत आहेत. त्यामुळे बाजारात हलक्या दर्जाचा कांदा दाखल होत आहे. बुधवारी बाजारात कांद्याच्या ९७ गाड्या दाखल झाल्या आहेत. परंतु ग्राहक कमी असून शेतमालाला उठाव कमी आहे, त्यामुळे दर घसरले आहेत, असे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे. मागील आठवड्यात उच्चतम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ८ ते १२ रुपयांवर होता, तो आता ५ ते १०रुपये तर पाल्याचा कांदा ३ ते ५रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Navi Mumbai, price garlic,
नवी मुंबई : लसणाच्या दरात तेजी, घाऊक बाजारात प्रतिकिलो ४०० रुपयांवर

हेही वाचा>>>नवी मुंबई : पदपथावरील पोत्यात रक्ताचे ओघोळ दिसल्याने उडाली खळबळ, पोलीसांनी तपासल्यावर प्रत्यक्षात…

सध्या बाजारात कांद्याची आवक अधिक आहे,परंतु पावसाने खराब तसेच हलक्या प्रतिचा कांदा दाखल होत आहे. त्यात ग्राहक कमी झाल्याने कांद्याला उठाव नाही,त्यामुळे दर गडगडले आहेत.-महेश राऊत,व्यापारी, एपीएमसी