नवी मुंबई पोलीस व सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील घटनांवर नजर ठेवण्यासाठी बारा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र या कॅमेऱ्यासाठी लागणारा अखंडीत वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून होत नसल्याने अनेकदा उरणमधील घटनांची माहिती पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे महावितरणने नियमित वीज पुरवठा करावा, अशी अपेक्षा नवी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे.

हेही वाचा- शीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं

खंडीत वीजेचा सीसीटीव्हीवर परिणाम

उरण तालुक्यातील वाढते औद्योगिक व नागरीकरण यामुळे येथील नागरिकांची सुरक्षा ही ऐरणीवर आली आहे. त्यामुळे तालुक्यात घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी सिडको मदतीने नवी मुंबई पोलीसांनी उरण मधील शहर तसेच तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांचे नियंत्रण पोलिसांकडून केले जात आहे. मात्र त्यासाठी अखंडीत वीज पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे उरणमधील वीज वितरण नियमितपणे करण्याची अपेक्षा पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत डेंग्यू ,मलेरिया रुग्णांत वाढ; जानेवारी ते आतापर्यंत मलेरियाचे ६० तर डेंग्युचे १० रुग्ण

महावितरण विभागाकडून स्पष्टीकरण

या संदर्भात उरणच्या महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनावले यांच्याशी संपर्क साधला असता सर्व सीसीटीव्ही हे पथदिव्यावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणकडून पथदिवे बंद न करताच काम केले जात असल्याने वीज खंडीत होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.