सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे एकता दौड आयोजित करण्यात आली होती. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या दौडीत तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. या वेळी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ऐक्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. यानिमित्त महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे शहरात विविध ठिकाणी सुरक्षाविषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.