scorecardresearch

ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज आता ऑफलाइन भरता येणार; शेवटच्या दिवशी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ

येत्या १८ डिसेंबरला राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, राज्यभरात, मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत असल्यामुळे वेबसाईट हँग होऊ लागल्याच्या तक्रारी येत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज आता ऑफलाइन भरता येणार; शेवटच्या दिवशी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ
ग्रामपंचायत निवडणूक अर्ज आता ऑफलाइन (संग्रहित छायाचित्र)

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असलेली वेबसाईट हँग होत असल्याने वाढत्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने गुरुवारी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज भरण्याची मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीची दुपारी ३ वाजताच्या वेळेत ही वाढ करून ती ५.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: १० वीच्या सराव परीक्षेत ७० शाळा, दहा हजार विद्यार्थी सहभाग

येत्या १८ डिसेंबरला राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सोमवारपासून ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असलेल्या एकाच पोर्टलवर संपूर्ण राज्यातील अर्ज दाखल केले जात आहेत. परिणामी राज्यभरात ही वेबसाईट हँग होऊ लागल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक उमेदवार तर आपले अर्ज वेळेत भरता यावेत याकरीता रात्रभर वाट पाहत होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उरण तहसील कार्यालयात आलेल्या उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात होता. याच्या तक्रारी अनेकांनी तहसीलदार यांच्याकडे ही केल्या.

हेही वाचा- नवी मुंबई: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत स्वच्छताकर्मीही होत आहेत आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित

या तक्रारी संदर्भात आपण निवडणूक आयोगाला सूचना पाठविली असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. ही स्थिती संपूर्ण राज्यात असल्याने राज्य भरातून आलेल्या तक्रारीची नोंद घेत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती उरण तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी त्रस्त असलेल्या उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:00 IST

संबंधित बातम्या