नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी बनवले विद्युत वाहन चार्जिंग केंद्र | Electric vehicle charging station made by students amy 95 | Loksatta

नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी बनवले विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

खारघर येथील एनएमआयएमएसच्या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रियेश जोशी आणि हर्ष या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी झिरोव्हॉल्ट विद्युत वाहन चार्जिंग केंद्र आणि सॉफ्टवेअर बनवले आहे.

नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी बनवले विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
विद्यार्थ्यांनी बनवले विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

खारघर येथील एनएमआयएमएसच्या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रियेश जोशी आणि हर्ष या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी झिरोव्हॉल्ट विद्युत वाहन चार्जिंग केंद्र आणि सॉफ्टवेअर बनवले आहे. विद्युत वाहनांचे युग सुरू झाले असताना, विद्युत वाहन चार्जिंग केंद्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव आहे. भारतातील ईव्ही चार्जिंग उद्योगाची पूर्तता करण्यासाठी एक कार्यक्षम, शाश्वत आणि परवडणारे उपाय तयार करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगून हे कल्पकेतेतून चार्जरचे सुरळीत व्यवस्थापन आणि ऑपरेशनसाठी सॉफ्टवेअर (चार्जिंग स्टेशन मॅनेजमेंट सिस्टम) विकसित केले आहे .

हेही वाचा >>>शुक्रवारी उरण मध्ये शतकी पावसाची नोंद

देशात आता मोठ्या प्रमाणात विद्युत वाहनांची विक्री सुरू झाली आहे. मात्र अजूनही विद्युत वाहनं चार्ज करण्यासाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. झिरोव्हॉल्ट चार्जिंग केंद्राच्या माध्यमातुन वेगवान वाहन चार्जिंग करता येईल असा दावा प्रियेश यानी केला आहे. तसेच स्मार्ट मोबाइल ऍपप्लिकेशन विद्युत वाहन चालकांना त्यांचे वाहन शोधण्यात आणि वेळेत चार्ज करण्यास मदत करेल. चार्जींग कमी वेळेत लवकर चार्जिंग होणार आहे. एक तासा ऐवजी पाच ते पंधरा मिनीटांत चार्जींग होते. सर्व गाड्यांसाठी एकच चार्जर, डीसी असल्यामुळे चार्जींग जलद होते, कमी जागा लागत असल्याने शैक्षणिक संस्था, रहिवासी इमारती, व्यावसायिक संकूले, पेट्रोल पंप, हायवेवरील छोटे- मोठे व्यापारी हे चार्जींग स्टेशन लावू शकतात. याद्वारे अर्थार्जनही करू शकतात. मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (B.E.S.T) आणि चलो मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागीदारीत भारतातील सर्वात वेगवान ३ विद्युत वाहन चार्जिंग केंद्र स्थापन करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 18:35 IST
Next Story
नवी मुंबई : वादग्रस्त माजी नगरसेवक मनोहर मढवी अखेर हद्दपार