scorecardresearch

नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू राहतील

वीजबिल वसुली अत्यंत गरजेची असल्याने ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी, तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गुरुवारी राम नवमी, शनिवार व रविवारी वीज भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.

Electricity bill payment Navi Mumbai
नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू राहतील (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी आता सुट्टीच्या दिवशीही वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामाच्या दिवशी वीज देयके भरणा शक्य नसल्याने थकबाकी वाढत आहे. वीजबिल वसुली अत्यंत गरजेची असल्याने ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी, तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गुरुवारी राम नवमी, शनिवार व रविवारी वीज भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.

भांडूप परिमंडळात वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. याशिवाय, तात्पुरता व कायमस्वरुपी खंडित केलेल्या वीज जोडणीची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनधिकृतपणे वीज वापरत असलेल्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृतपणे वीजेचा वापर करावा व आपले वीजबिल नियमितपणे भरावे, असे आवाहन भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी ग्राहकांना केले.

हेही वाचा – नवी मुंबईत २ एप्रिलला गौरव यात्रा; भाजपा आणि शिवसेनेकडून एकत्रित पत्रपरिषदेत माहिती 

हेही वाचा – नवी मुंबई : एप्रिलमध्ये शहरातील धोकादायक वृक्ष सर्वेक्षणाला होणार सुरुवात

ग्राहकांच्या सोयीसाठी भांडूप परिमंडळातील सर्व वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी राम नवमीच्या दिवशी, तसेच  शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी सुरू राहतील. वीज ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in अथवा महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप अशा ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या वीजबिल भरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:42 IST

संबंधित बातम्या