उरण : सोमवारी दिवसभर उरण शहर आणि ग्रामीण भागातही बारा तासाहून अधिक काळ वीज गायब होती. एकीकडे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

उरण शहर आणि ग्रामीण भागात बहुतांशी परिसरात विजेचा नेहमीचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे महावितरण कंपनीच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पोलखोल झाली आहे.

Traffic congestion in Radhanagar Khadakpada Kalyan West disturbs residents and students daily
कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Pimpri-Chinchwad, vandalism vehicles Pimpri-Chinchwad,
VIDEO : तोडफोडीचे सत्र सुरूच: पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांत २७ वाहनांची तोडफोड
More than seven goons gathered in Kathe House area of ​​Satpur and threatened residents with koytta
नाशिक : सातपूरमध्ये कोयत्यांसह धमकाविणारे ताब्यात, चार विधीसंघर्षित बालकांचा समावेश
flood in nagpur on Ambazari lake due to vivekanand statue
नागपूर :पुरासाठी पुतळा कारणीभूत ठरला का ? एक वर्षांनंतरही प्रश्न अनुत्तरित
House collapse in dangerous Kazigadi area along Godavari in Nashik nashik
नाशिकमध्ये धोकादायक काझीगढीत घरांची पडझड; सुमारे १०० रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Traffic restrictions on central roads in Nashik during Ganeshotsav 2024
गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद
tribal development department
आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची पदे भरणार, आदिवासी विकास विभागाचा निर्णय

हे ही वाचा… Badlapur School Crime Case Live Updates: भाजपाला धक्का; कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार?

मागील आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून विजेची आवश्यकता आहे. मात्र त्याचवेळी उरण तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. बोकडवीरा गावातील वीज अनेकदा वारंवार ये जा करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात महावितरणच्या उपअभियंत्यांना विचारणा केली असता झम्पर जात असल्याचे कारण त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी महावितरणच्या पनवेल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या स्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही.

यामध्ये सोमवारी उरण शहरातील आंनद नगर, बोरी आदी भागांत अनेक तास वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उरणमध्ये सध्या अनेक ठिकाणी उंच इमारती आहेत. या इमारतींच्या पायऱ्या चढ-उतार कराव्या लागला. त्याचप्रमाणे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याचीही तयारी सुरू आहे. मात्र वीज सातत्याने ये जा करीत असल्याने या तयारीवर परिणाम झाला आहे. गणपती कारखाने व व्यावसायिक यांनाही फटका बसत आहे. तालुक्यातील चिरनेरसह पूर्व विभागातील वीज कायमस्वरूपी खंडित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा… Badlapur sexual abuse case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन पूर्वनियोजित; पोलिसांची माहिती

उरणच्या मुख्य विद्याुतवाहिनीत बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उरण शहरातील वीज वारंवार खंडित होत असेल तर त्या संदर्भात दुरुस्ती करण्यात येईल. – संजय चाटे, अभियंता, महावितरण कंपनी, उरण