scorecardresearch

Premium

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा अचानक खंडित

वाशी-ठाणे मार्गावर तुर्भे-कोपरखैरणेदरम्यान ओव्हरहेडला होणारा विद्युतपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे लोकल बंद पडली.

Overhead wire Trans Harbor route
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा अचानक खंडित (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नवी मुंबई : वाशी-ठाणे मार्गावर तुर्भे-कोपरखैरणेदरम्यान ओव्हरहेडला होणारा विद्युतपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे लोकल बंद पडली. ही माहिती त्वरित मध्य रेल्वे प्रशासनाने उद्घोषणा करून प्रवाशांना दिली. या दरम्यान सुमारे वीस मिनिटे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद ठेवावी लागली होती.

हेही वाचा – नवी मुंबई: एपीएमसीतील आंब्याच्या हंगामावर एफडीएची करडी नजर

harbor Trans-Harbor routes delayed yard remodeling work near Panvel railway station
हार्बर मार्गावर लोकल वाहतूक १५ मिनिटे उशिरा तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांची पनवेल गाडी रद्द
local passengers, panvel mumbai local, local passengers suffer due to low speed
पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल
goods train derailed
पनवेल येथे मालवाहू रेल्वेचे डबे घसरले
traffic on mumbra panvel highway
मुंब्रा पनवेल महामार्गावर नावडे ते रोडपाली वाहतूक कोंडी

हेही वाचा – नवी मुंबई: बेशिस्त रिक्षा पार्किंग मुळे एकाचा जीव गेला

तीन वाजण्याच्या सुमारास विद्युतपुरवठा पूर्ववत झाल्यावर लोकल सुरू झाल्या. आज सुट्टीचा दिवस असल्याने प्रवासीसंख्या फार नव्हती. तसेच दुपारची वेळ असल्याने प्रवासीसंख्याही जास्त नसल्याने फार मोठा खोळंबा झाला नाही. मात्र बंद पडलेल्या लोकलमधून अनेक प्रवासी कोपरखैरणे रेल्वे स्टेशन नजरेच्या टप्प्यात असल्याने उतरून गेले होते. मात्र लांबच्या टप्प्याचे प्रवासी बसून राहिले. याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले की, ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा तांत्रिक बिघाडाने बंद झाला होता. मात्र तीननंतर सर्व वाहतूक सुरळीत झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Electricity supply in overhead wire on trans harbor route suddenly cut off ssb

First published on: 07-04-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×