महावितरण भांडूप परिमंडळात वीजचोरी पकडण्याची मोहीम सातत्याने घेण्यात येत असून वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शामकांत बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहे एप्रिल २०२२ पासून ते आता पर्यंत वाशी विभागात १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली आहे. याशिवाय, अनधिकृतपणे विजेचा वापर करून ५१ लाख ७० हजार रुपयांचा महावितरणचा नुकसान झाला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नवं वर्षाच्या स्वागतादरम्यान शेतघर, डोंगर, वन परिसर, आणि धरण परिसरावर पोलिसांची नजर 

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
Melghat
मेळघाटातील दुर्गम भागात मतदान प्रक्रियेत वायरलेस सुविधांचाच आधार
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष

महावितरण भांडूप परिमंडलात वीज चोरी पकडण्याची मोहीम सतत चालू असते. एप्रिल २०२२ ते आतापर्यंत महावितरणच्या वाशी मंडळातील ऐरोली, कोपरखैरणे व वाशी येथील ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली आहे. सदर तपासणीत, विविध ठिकाणी वीजचोरी तसेच विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले आहे. विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार ३३५ प्रकरणात १ कोटी १७ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. या याशिवाय, विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ७२ प्रकरणात ५१ लाख ७० हजार रुपयांचा अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागताला व सरत्या वर्षाच्या निरोपाला वाहतूक पोलीस रात्रभर रस्त्यावरच

येत्या काळात सदरची मोहीम अती तीव्रतेने राबविण्यात येणार आहे म्हणून कोणीही वीज चोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना दिला आहे. ग्राहकांनी वीज चोरी केल्यास त्यांच्यावर सातत्याने कडक कारवाई करण्यात येईल.तसेच मीटरची तपासणी मोहीम घेण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी दिली
,