scorecardresearch

२४ महिन्यांचे घरभाडे चक्क २० लाख ५०,००० रुपये! कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याचा कारनामा

अभिषेक हे नवी मुंबईतील ऐरोली येथील एटॉस ग्लोबल आय. टी. सोल्युशन ॲण्ड सर्व्हीसेस प्रा. लीमीटेड या कंपनीत कामाला आहेत.

२४ महिन्यांचे घरभाडे चक्क २० लाख ५०,००० रुपये! कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याचा कारनामा
प्रतिनिधिक छायाचित्र

संतोष सावंत, लोकसत्ता

पनवेल ; नवी मुंबईतील एका कर्मचा-याने त्याच्या कंपनीला घरभाड्याच्या खोट्या पावतीबिले जमा करुन त्यांच्याकडून २० लाख ५० हजार रुपये स्वताकडे वळते केले. घरमालकाला कंपनीने पहिलेच घरभाडे दिल्याचे कंपनी व्यवस्थापकांच्या ध्यानात आल्यावर कंपनीच्या व्यवस्थापकांनी थेट पोलीसांत अर्ज केला. तीन महिन्यांपूर्वी अर्ज करुन तक्रार दिल्यानंतर नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणी संबंधित कर्मचा-याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर संबंधित कर्मचा-याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल (कोलकोता) येथील मूळ रहिवाशी असणारे ३९ वर्षीय अभिषेक घोष हे अर्किटेक्ट आहेत. अभिषेक हे नवी मुंबईतील ऐरोली येथील एटॉस ग्लोबल आय. टी. सोल्युशन ॲण्ड सर्व्हीसेस प्रा. लीमीटेड या कंपनीत कामाला आहेत.२०१८ ते २०२२ या दरम्यान अभिषेकला एटॉस या कंपनीने कामानिमित्त जर्मनी येथे पाठविले होते. जर्मनी येथे कंपनीने अभिषेक यांच्या राहण्याची सोय केली होती. कंपनीने जर्मनी येथे अभिषेक राहत असलेल्या घरभाडे या घराचे मालक डब्ल्य. ब्रान्देनबुर्ग यांना दिले होते. तरीही अभिषेक याने जर्मनीत राहत असलेल्या २४ महिन्यांच्या घरभाडयाच्या पावत्या कंपनीकडे पाठवून त्याने कंपनीकडून २० लाख ५० हजार रुपये स्वताकडे वळते केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या