scorecardresearch

उड्डाण पुलाखालील जागा शालेय बसला आंदण ?

सिवूड रेल्वे स्थानकालगतच्या उड्डाणपूलाखाली जवळ जवळ ५ ते ६ बसेस या उभ्या केल्या आहेत.

उड्डाण पुलाखालील जागा शालेय बसला आंदण ?
सिवूड रेल्वे स्थानकालगत च्या उड्डाणपूल खाली शालेय बसचे अतिक्रमण

सिवूड रेल्वे स्थानकालगतच्या उड्डाणपूलाखाली शालेय बस उभ्या करून त्याठिकाणी अनधिकृतपणे वाहनतळ सुरू झाले आहे. शहरातील तसेच महामार्गावरील उड्डाणपुलाखाली कोणतेही अतिक्रमण किंवा कोणताही वापर करण्यास नियमात नाही, मात्र या उड्डाणपुला खालील जागा शालेय बस धारकांना आंदण म्हणून दिली आह का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा- मुंबई वाशी मार्गावर १० लेनचा नवीन टोलनाका! मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे लक्ष

झोपड्यांचे अतिक्रमण टाळण्यासाठी लोखंडी जाळी

मुंबई उच्च न्यायालल्याने शहररातील तसेच महामार्गावरील उड्डाण पुलाखाली अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केलेली आहे. तरी देखील आज ही बहुतांशी उड्डाणपुला खाली वाहने पार्क केली जात आहेत. एकीकडे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने उड्डाणपूलाखालील अतिक्रमण टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. महामार्गालगत असलेल्या उड्डाणपूलाखालील झोपड्यांचे अतिक्रमण टाळण्यासाठी लोखंडी जाळी बसवण्यात येत आहे.

हेही वाचा- शहरबात : पालिकेच्या अधिकारांवर गदा

उड्डाणपूलांखाली वाहनांचे अतिक्रमण

मात्र, दुसरीकडे अद्याप काही उड्डाणपूलांखाली वाहनांचे अतिक्रमण झालेले निदर्शनास येत आहे. सिवूड रेल्वे स्थानकालगतच्या उड्डाणपूलाखाली जवळ जवळ ५ ते ६ बसेस या उभ्या केल्या आहेत. शाळांना स्वतःची पार्किंग व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र या बसेस शालेय आवारात पार्क न करता उड्डाणपूलाखाली उभ्या केल्या आहेत. शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना वाहतूक नियंत्रण आणि त्याच अनुषंगाने पार्किंगचा मुद्दा अलीकडे अतिशय क्लिष्ट आणि आव्हानात्मक झाला आहे. अवैधरीत्या वाहने पार्क करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या