नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत घर क्र- एफ-२०३, से-0३, ऐरोली नवी मुंबई येथे श्री. वसंत साठे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घेण्यात आलेल्या परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याने तसा अहवाल नगररचना विभागाकडून प्राप्त झाला होता. वसंत साठे, घर क्र- एफ-२०३, से-0३, ऐरोली नवी मुंबई यांच्या अनधिकृत बांधकामास जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती.
संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.सदर अनधिकृत बांधकाम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हटवण्यात आले. या धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, मजूर १०, ब्रेकर-२, घन- ३ तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.