scorecardresearch

उरणच्या ‘पेन्शनर्स पार्क’ला अतिक्रमणांचा विळखा

निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून विविध सुविधा पुरविल्या जात असून उरण नगर परिषदेकडून उरण शहर ते मोरा मार्गावर पेन्शनर्स पार्क उभारण्यात आली आहे.

उरण : निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून विविध सुविधा पुरविल्या जात असून उरण नगर परिषदेकडून उरण शहर ते मोरा मार्गावर पेन्शनर्स पार्क उभारण्यात आली आहे. मात्र सध्या या भागात झालेल्या अतिक्रमणांमुळे हे पार्क हे केवळ फलकापुरतेच उरले आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विविध उद्योग तसेच शासकीय, निमशासकीय व खासगी कायार्लयातून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या उरणमध्ये मोठी आहे. त्यांना सकाळ, संध्याकाळी विरंगुळा मिळावा, आपल्या मित्रांना भेटून गप्पा मारता याव्यात याकरिता उरण नगर परिषदेकडून पेन्शनर्स पार्क तयार करण्यात आले आहे. येथे काही सामाजिक संघटनांनी वृक्षारोपणही केले आहे. त्यामुळे या वृक्षांची उन्हाळय़ात सावली पडण्यास मदत होत आहे. या पेन्शनर्स पार्कमध्ये असलेल्या बाकांवर बसून ज्येष्ठ नागरक चर्चा करीत असत. तसेच उरणमधील अनेक कार्यक्रमांची सुरुवात याच पेन्शनर्स पार्कमधूनच होत असे. मात्र सध्या या पेन्शनर्स पार्कवरच अतिक्रमण झाले असून येथील पदपथावर पेन्शनर्स पार्कचा फक्त फलकच शिल्लक राहिला आहे. या संदर्भात उरण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Encroachments uran pensioners park senior citizens retirement uran municipal councilor amy