अंदाजित रकमेपेक्षा ९ टक्के कमी दर

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वादग्रस्त फेरनिविदा अखेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी टाटाने तीन निविदाकरांना मागे टाकून मिळाली आहे. गेल्या वर्षी १५४ कोटी रुपये खर्चाची ही  निविदा थेट २७१ कोटी खर्चापर्यंत देण्याचा घाट रचला जात होता. मात्र यावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठविलानंतर ही निविदा रद्द करून तिची फेरनिविदा काढण्यात आली. यात टाटा, बेल या सारख्या मोठया स्पर्धकांनी भाग घेतला होता. १५४ कोटी रुपयांची हा खर्च आता १२७ कोटी ६३ लाखांत होणार आहे. पालिकेचे यामुळे २८ कोटी रुपये खर्चाची बचत झाली आहे.

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

शहरात मोक्याच्या ठिकाणी एक हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोठय़ा शहरांत सीसीटीव्ही कॅमेरांची गरज भासू लागली. नवी मुंबई पालिकेने राज्याच्या गृहविभागाच्या या निर्णयाची दखल घेऊन शहरात पाच कोटी रुपये खर्च केल्यानंतर २६८ सीसी टीव्ही कॅमेरे २०१२ मध्ये बसविण्यात आले. हे सीसीटीव्ही कॅमेरे पाच वर्षांनंतर नादुरुस्त होऊ लागल्याने मागील तीन वर्षे शहरात नव्याने सीसीटीव्ही कॅमेर बसविण्याचे गरज व्यक्त होऊ लागली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एक हजार ४०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पोलीस दलाची कमकुवत आर्थिक बाजू पाहता नवी मुंबई पालिकेने या सर्व कॅमेरांची खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार १४०० सीसी टीव्ही कॅमेरांसाठी एकूण १५४ कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी एका कंत्राटदारांची कमीत कमी दर हा २७१ कोटी रुपये आला. ११६ टक्के जादा दराने ही निविदा दिली जाणार होती. यासाठी या कंत्राटदाराने चांगलीच पेरणी केली होती. मात्र प्रसारमाध्यमे आणि काही जागृत नागरिकांनी उठविलेल्या या आवाजामुळे पालिकेला ही निविदा रद्द करावी लागली होती.  पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही नसती आफत टाळण्यासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. मागील सहा महिने ही प्रक्रिया सुरू होती. अखेर तांत्रिक व आर्थिक देकार खुले झाल्यानंतर १५४ कोटी रुपये खर्चाचे हे काम टाटाने कमीत कमी १२७ कोटी रुपये खर्चात करण्याची तयारी दर्शवली आहे. टाटाच्या गुणवत्तेबद्दल शंका नसल्याने आता हे काम योग्य प्रकारे होईल असा विश्वास नवी मुबंईकरांना वाटत आहे.

पाच वर्षांचा देखभाल खर्च

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास हातभार लावणारे हे सीसीटीव्ही कॅमेरे उत्तम दर्जा व गुणवत्तापूर्वेक असावेत असा प्रयत्न प्रशासनाचा होता. त्यामुळे फेरनिविदा काढून प्रशासनाने पारदर्शक कामाची ग्वाही दिली आहे. टाटा उद्योग समूहाला हे काम मिळाले असल्याने येत्या सहा महिन्यात प्रत्यक्षात तिसरा डोळा काम करणार आहे. पाच वर्षांचा देखभाल खर्च यात समावेश असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.