राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई अध्यक्ष पदी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांची निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्याने माजी अध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.ते शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होणार असून गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शिंदे गटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचा गट प्रवेश आज होणार होता .पण तो एका नगरसेवकाला मातृशोक झाल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. शनिवार पासून पितृपक्ष सुरू होत असल्याने हा गट प्रवेश आता नवरात्रोत्सव काळात होण्याची शक्यता आहे गावडे यांच्या बरोबर राष्ट्रवादी च्या सहा नगरसेवकांपैकी चार जण शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा होती मात्र गावडे यांच्या सोबत शिंदे गटात जाण्यास या नगरसेवकांनी नकार दिला आहे.

हेही वाचा >>> विकासकांची मुंबई पेक्षा नवी मुंबईला पसंती

त्याऐवजी ते थोड्या काळाने शिंदे गट किंवा भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते त्यामुळे गावडे यांच्या सोबत त्यांची कन्या माजी नगरसेविका स्वप्ना गावडे ह्या एकमवे माजी नगरसेविका असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी मधील या फुटीमुळे या पक्षात केवळ दोन माजी नगरसेवक शिल्लक राहण्याची शक्यता आहे. पक्षातील गटबाजीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे गावडे यांनी सांगितले आमदार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करताना संपूर्ण पक्ष रिकामा केलेला असताना आपण पक्षाचा झेंडा घेऊन एकटेच उभे राहिलो होतो.पक्षाने किमान त्याचा विचार करण्याची आवश्यकता होती त्याऐवजी कोणत्याच पक्षात जास्त काळ न टिकलेल्या व्यक्तीला रातोरात अध्यक्ष करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया गावडे यांनी दिली शिंदे गट का या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे अतिशय तळागाळातून या पदापर्यंत पोहचले आहेत त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे.त्यांच्यात अहंकार नाही त्यामुळे आपण शिंदे यांच्या सोबत पुढील वाटचाल करणार आहोत असे गावडे यांनी स्पष्ट केले गावडे यांनी २०१९ एमएएसटी बेलापूर विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी तिकीटावर लढवली होती त्यांना ४६ हजार मते मिळाली होती. शिंदे गटात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सामील व्हावे यासाठी वाशीतील एक पुनर्विकास प्रसिद्ध माजी नगरसेवक प्रयत्नशील आहे त्यासाठी शिंदे गटात सामील होणाऱ्या माजी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील पुनर्विकासाचे गाजर दाखविले जात आहे