लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभावित क्षेत्रातील (नैना) संतापलेले शेतकरी गुरुवारच्या आंदोलनात पनवेल ते बेलापूर असा वाहनातून प्रवास करुन सिडको मंडळाचे बेलापूर येथील कार्यालय गाठण्यासाठी खांदेश्वर वसाहतीसमोरील मार्गावर एकवटले आहेत. नैना प्राधिकरण जाहीर होऊन ९ वर्षे उलटली तरी विकास होत नाही. शेतकऱ्यांच्या शंभर टक्के जमिनी घेऊन त्यांना अवघे ४० टक्के विकसित जमिन देणाऱ्या नियमांविरोधात गुरुवारचे हे आंदोलन पुकारण्यात आले होते.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

सिडको हटाव आणि शेतकरी बचाव अशी भूमिका संतापलेल्या शेतकऱ्यांनी घेतली असून गुरुवारी बेलापूर येथील सिडको भवनपर्यंत शेतकऱ्यांकडील दुचाकी, चारचाकी, तीन आसनी रिक्षा घेऊन शेतकरी या आंदोलनात सामिल झाले आहेत. या आंदोलनाला महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांचा पाठिंबा आहे. नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष संघर्ष समिती, ९५ गाव संघर्ष समिती आणि इतर सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय आधिवेशनामध्ये या विषयावर प्रश्न उपस्थित करुन हे आंदोलन फसवे असल्याचा आरोप केला होता. तरीही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उतरले आहेत.

आणखी वाचा- पाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई पोलीसांकडून सोनसाखळी चोरी प्रकरणातील पिडीत महिलांना दिलासा

नैना प्राधिकरणाने पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये विकासाचे स्वप्न दाखवून विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यामुळे येथील जमिनींचे व्यवहार ठप्प झाले. गेल्या ९ वर्षात नैना प्राधिकरणातील जटील अटींमुळे या परिसरातील इमारत बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकल्या. उर्वरीत जमिनींचे मालक मिळून हा लढा उभारत आहेत. पनवेल तालुक्यातील पालिका क्षेत्रात आणि एमएमआरडीएच्या क्षेत्रात वेगळे बांधकाम नियम आणि नैना क्षेत्रात वेगळे नियम असल्याने शेतक-यांनी महाविकास आघाडी, ९५ गाव संघर्ष समिती, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष संघर्ष समिती स्थापन करुन सरकार विरोधात आंदोलन उभे केले.

१२ फेब्रुवारीपासून २३ गावांमध्ये व्यवहार टप्याटप्याने बंद ठेऊन शासनाविरोधात गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर सिडको महामंडळाला जाग येण्यासाठी गुरुवारी निघणारी वाहनफेरी आयोजित केली. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील हे या शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. कोकण शिक्षक मतदार संघाची आमदारकी गमावल्यानंतर शेकाप नेतृत्व करत असलेले हे आंदोलन फसेल अशी अफवा पनवेलमध्ये पसरविण्यात आली. त्यानंतर ९५ गाव संघर्ष समितीमध्ये दोन गट पडल्याचेही चर्चा घडविण्यात आली. मात्र या सर्व अफवांवर मात करत गुरुवारी सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे वाहनफेरी सहभाग नोंदवला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बुधवार हा आंदोलनाची तिव्रता किती असेल याचा कयास लावण्यात व्यस्त गेला. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी लावला होता.

सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार होती. सकाळी ११ वाजता तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून आंदोलक खांदेश्वर येथे एकत्र आले. आदई सर्कल, पनवेल शहर येथून मोठ्याप्रमाणात आंदोलक खांदेश्वर वसाहतीसमोरील महामार्गासमोरील रस्त्यावर जमले होते. सिडको महामंडळाच्या बेलापूर येथील सिडको भवन या इमारती पर्यंत ही वाहन फेरी जाणार आहे. नैना हटाव आणि शेतकरी बचाव’ अशा आशयाचे फलक तसेच काळे आणि लालबावट्याचे झेंडे घेऊन वाहनफेरीत आंदोलक एकत्र आले आहेत. कायदा व सव्यवस्था चोक रहावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे नेमले आहेत.

आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन करण्याची वेळ नैना बाधिक शेतकऱ्यांवर आली आहे. गेली सात वर्षे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मंत्रालय, सचिवालय आणि विधीमंडळात मांडल्या मात्र सरकारला जाग येत नसल्याने प्रेमाने न ऐकणाऱ्यांना शेतकऱ्यांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. आधिवेशन सुरु असताना नैना विरोधी लढ्याचे रणशिंग फुंकले आहेत. -बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप