scorecardresearch

लेखी आश्वासन न पाळल्याने जीवन यात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांना सिडको भवनावरुन पोलीसांनी ताब्यात घेतले

पनवेल तालुक्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी बेलापूर येथील सिडको भवन येथे जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.

Farmers who ended their life journey due to non-fulfillment of written promise were detained by the police
संबंधित आंदोलकांना पोलीसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

पनवेल: पनवेल तालुक्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी बेलापूर येथील सिडको भवन येथे जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित आंदोलकांना पोलीसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. या आंदोलकांमध्ये अॅड. सूरेश ठाकूर, शिवकर गावाचे माजी सरपंच अनिल ढवळे, अॅड. मदन गोवारी, नरेश भगत, दत्ता भगत, गडकिल्ले अभ्यासक सूधाकर लाड यांचा समावेश आहे.

three people injured in leopard attack
नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी
farm water pumps, theft cases in kalwan, farm water pumps in kalwan, 5 detained for theft of farm pumps in nashik
नाशिक : कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीत वाढ, पाच संशयित ताब्यात
Gutkha worth 99 thousand seized in Dombivli
डोंबिवलीत ९९ हजाराचा गुटखा जप्त; विक्रीसाठी दुचाकीचा वापर
MNS Protest
“टोलनाक्यावर दगडं मारून एकनाथ शिंदे…”, मनसे नेत्याची टीका; आंदोलन केल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात!

पळस्पे गावाजवळ शेतक-यांनी नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केल्यावर सिडको मंडळाचे मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर यांनी शेतकरी अनिल ढवळे यांना २६ जूनला दिलेल्या आश्वासन पत्रात नैना परिक्षेत्रातील परंतू गावठाण क्षेत्राबाहेरील राहत्या घरांखालील जमिनींच्या मालकी हक्क व इतर बाबींची तपासणी झाल्यानंतर मालमत्ता पत्रक (प्रोपर्टी कार्ड) विहीत कार्यपद्धती अवलंबून तीन महिन्यात देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच महिने झाले तरी मालमत्ता पत्रक देण्याची कार्यवाही न झाल्याने संतप्त आंदोलकांनी हा पवित्रा घेतला.

आणखी वाचा-‘एमआयडीसी’कडून मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठ्यामुळे ऐरोली, घणसोलीत पाणी प्रश्न

पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत अनिल ढवळे यांनी निवेदन दिले होते. पोलीस विभागाचे पोलीस मंगळवारी ढवळे आणि इतर आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. अखेर दुपारी सव्वा वाजण्याच्या सूमारास आंदोलक सिडको भवनाच्या प्रवेशव्दारावर आल्यावर त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी सिडको मंडळाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधला आहे. मात्र ही कार्यवाही नेमकी किती दिवसात पुर्ण होईल याबाबत साशंकता असल्याने शेतकरी संतापले आहेत. शासनाने १० वर्षांपुर्वी नैना प्राधिकरण पनवेल, उरण व इतर तालुक्यांमध्ये जाहीर केले. मात्र नैनाच्या प्रारुप विकास आराखड्यामुळे गावठाणांबाहेरील घरे अनियमित ठरविली गेली. आजोबांपासून राहणारे घर अचानक कसे बेकायदा ठरले यासाठी हे शेतकरी लढत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmers who ended their life journey due to non fulfilment of written promise were detained by the police from cidco bhawan mrj

First published on: 21-11-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×