नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एकीकडे महापालिका आयुक्त शहरात हरित क्षेत्र निर्माण करण्यावर जोर देत असताना दुसरीकडे शहरातील विकास कामाच्या नावाखाली शेकडो झाडांचा बळी देण्यात येत आहे . पामबीच मार्गावर वाशी कोपरी उड्डाण पुलाच्या कामात ३९० झाडे बाधीत होणार असताना आता याच मार्गावर सानपाडा येथील भुयारी मार्गात २२४ झाडे बाधीत होत आहेत. तसेच सायकल ट्रॅकसाठी ही २१ झाडे बाधित होणार आहेत. हरित क्षेत्र निर्माण नियोजनाबरोबरच शहरात असलेली हरितसंपत्ती विकास कामाच्या नावाखाली संपुष्टात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच विकास कामे पर्यावरणाच्या मुळावर असून परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होईल अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: २ वाहन चोरांकडून २१ वाहने जप्त; एपीएमसी पोलिसांची कारवाई

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

नवी मुंबई शहराचा रत्नहार म्हणून पामबीच मार्गाची आज ओळख आहे. त्यामुळे या रस्तावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर नवी मुंबई महानगर पालिकेच्यावतीने कोपरी येथे उड्डाणपूल व सानपाडा येथे भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. कोपरी उड्डाण पुलात ३९० झाडे बाधीत होणार असून त्यातील ३८४ झाडे स्थलांतरित व ६ झाडे तोडली जाणार आहेत. मात्र सानपाडा भुयारी मार्गात २२४ झाडांपैकी १९२ झाडे सरसकट तोडली जाणार आहेत. तर केवळ ३२ झाडे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. सानपाडा नवीन भुयारी मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांचा बळी देण्यात येत आहे. नवी मुंबई शहरातील प्रदूषित हवा नियंत्रणात आणण्यासाठी शहरात विविध प्रकारे हरितपट्टा निर्माण करण्याचे नियोजन आयुक्त करीत आहेत. परंतु दुसरीकडे शहरात विविध विकास कामांकरिता विकासात अडथळा येणाऱ्या झाडांची मात्र सरसकट कत्तल करण्यात येत आहे. एक झाड तोडल्यास त्या ऐवजी ५ झाडे लावण्याचा नियम आहे परंतु नवी मुंबई महानगरपालिकेकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत असली तरी प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- जी 20 शिखर परिषदेच्या स्वागतासाठी नवी मुंबईत ५६ फूट आकाराची भव्य रांगोळी

पामबीच मार्गावरील विकास कामात ६३५ झाडे बाधित

कोपरी उड्डाण पुलात ३९० झाडे बाधीत होणार असून यापैकी ३८४ स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. तर सानपाडा नवीन भुयारी मार्गासाठी २२४ झाडे तोडण्यात येणार असून त्यापैकी केवळ ३२ झाडे स्थलांतर करण्यात येणार आहेत. तर सायकल ट्रॅक साठी २१ झाडे बाधित होत असताना अतिरिक्त झाडे तोडल्याचा आरोप होत आहे. एकंदरीत पाम बीच मार्गावरील विकास कामात ६३५ झाडे बाधित होणार आहेत. कोपरी उड्डाणपूलात होणाऱ्या बाधित झाडांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले होते. आता या ठिकाणीही लोकप्रतिनिधी हरित संपदा वाचवण्यासाठी पावले उचलतील का ? याकडॆ नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा- पनवेल : धक्कादायक! जन्मदात्या आईने नवजात अर्भकाला शौचालयातून दिले फेकून, उलवे येथील घटना

एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी हरितक्षेत्र वाढवण्याचे मत व्यक्त करत आहेत . तर दुसरीकडे विकास कामांच्या नावाखाली असंख्य झाडे तोडून शहरातील हरित क्षेत्र नष्ट करण्यात येत आहेत. तसेच स्थलांतरित केलेला झाडांचेही पुढे जतन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्या शहरातील हरितसंपदा नष्ट करून करण्यात येणाऱ्या विकास कामांनी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका माजी परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी दिली.