पनवेल : विजयादशमीला (बुधवारी) संध्याकाळी पावणे आठ वाजता ठाण्याकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये महिला पोलीस जखमी झाली. लोकलमधील बसण्याचे आसनावरून तीन महिलांमध्ये बाचाबाचीने सुरुवात झाली. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होत्या. कोपरखैरणे येथे माराहाण केलेली महिला चढली. तुर्भे स्थानकात त्या महिलेला बसायला आसन मिळाले .परंतू छोट्या मुलीला बसू दिलं नाही यावरून प्रवासी महिलांचा शाब्दिक वाद सुरु झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर या शाब्दीक वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढली परंतू संतप्त प्रवासी महिलांनी त्यांनादेखील जुमानले नाही. यामध्ये महिला पोलिसाला सुद्धा मारहाण केली. या घटनेची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात केली असून ठाण्यावरून लोकलमध्ये चढलेल्या मायलेकीवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली. या घटनेत महिला पोलीस शारदा उगले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight broke between women over seating in local train lady constable turbhe panvel tmb 01
First published on: 06-10-2022 at 15:19 IST