नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना अटक |fightig in hotel two aacused arrested by navi mumbai police in koparkhairne | Loksatta

नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना पोलिसांकडून अटक

एका टोळक्याने दोन लोकांना बेदम मारहाण करीत त्यांच्या कडील मोबाईल व सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना पोलिसांकडून अटक
नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना पोलिसांकडून अटक

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील हॉटेलमध्ये एका टोळक्याने दोन लोकांना बेदम मारहाण करीत त्यांच्या कडील मोबाईल व सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. याबाबत गुन्हा नोंद झाल्यावर आता पर्यंत २ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे तर अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

नवी मुंबईत कोपरखैरणे येथे गजबजलेल्या सेक्टर १४ येथील क्वाँलिटी ऑफ पंजाब हॉटेल मध्ये संदीप तावरे हे आपल्या एका मित्रासह जेवण करीत होते. त्याच वेळी दहा ते बारा  जणांचे टोळके हॉटेल मध्ये दाखल झाले व ते ग्राहकांप्रमाणे जेवायला बसले. काही वेळातच एकमेकांना खुणावत ते उठले आणि संदीप व त्यांच्या मित्राला बेदम मारहाण सुरु केली. मारहाण नेमकी का कशामुळे हे न कळल्याने सर्वच जण गोंधळून गेले होते. मात्र काही वेळातच हे टोळके बाहेर पडले.

हेही वाचा: चार वर्षे गुंगारा देणाऱ्या अट्टल आरोपीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक

मात्र त्यांनी जाताना संदीप यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि दोघांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतले होते. संदीप यांनी याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १ ते दिडच्या सुमारास घडली होती.  या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपींनी  हे केवळ लुटीच्या उद्देशाने केले आहे. या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील शेळके करीत आहेत.  

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 11:57 IST
Next Story
चार वर्षे गुंगारा देणाऱ्या अट्टल आरोपीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक