scorecardresearch

वित्तीय कर्मचारी महिलेची ऑनलाईन कर्ज घेताना फसवणूक; रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

सुरुवातीला त्याने कागदपत्रे ऑनलाइन मागवली व काही वेळात ३ लाखांचे कर्ज  मंजूर झाल्याचे सांगितले व प्रोसेसिंग फी म्हणून साडेपाच हजारांची मागणी केली.

fraud
सायबर फसवणूक (फोटो: IE)

रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

नवी मुंबई : बँकेत कर्ज विभागात काम करणाऱ्या महिलेला कर्जाचे आमिष दाखवून ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सायबर विभाग करीत आहे.

संजीव कुमार असे यातील आरोपीचे नाव फोनवर सांगितलेले आहे. खरे नाव काय आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. यातील फिर्यादी सनम अडूळकर या एका बँकेत कर्ज विभागात नोकरीला आहेत. त्यांच्या बहिणीला ३ लाख रुपयांची गरज असल्याने त्यांनी सनम यांच्या मोबाइलवरून बजाज फायनान्स कंपनीशी संपर्क साधला. काही दिवसांनी त्यांना एक फोन आला व फोनवर संभाषण करणाऱ्याने स्वत:चे नाव संजीव कुमार

सांगितले.

सुरुवातीला त्याने कागदपत्रे ऑनलाइन मागवली व काही वेळात ३ लाखांचे कर्ज  मंजूर झाल्याचे सांगितले व प्रोसेसिंग फी म्हणून साडेपाच हजारांची मागणी केली. ते दिल्यावर वेगवेगळय़ा शुल्कासाठी  म्हणून १३ हजार ५०० रुपये , १२ हजार ८०० रुपये पाठवले. मात्र तरीही पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आम्हाला कर्ज नको, पैसे परत करा असा तगादा लावला. त्यावर संजीव कुमार याने सर्व पैसे परत मिळतील. आतापर्यंत जे काम केले त्याचे ८ हजार रुपये फी भरावी लागेल. तुमचे सर्व पैसे परत केले जातील असे सांगितले. त्यामुळे पुन्हा आठ हजार भरले. अशा पद्धतीने ४ नोव्हेंबर ते आतापर्यंत ५७ हजार ७८४ रुपये भरले. मात्र पुन्हा पुन्हा पैशांची केल्यावर काही काळाने फोन बंद झाला. त्यामुळे याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Financial employee woman fraud while taking online loans akp