पनवेल : उरण येथील बांधकाम व्यावसायिक महिलेवर मंगळवारी रात्री गोळीबार झाला आहे. ही घटना जुन्या पनवेल उरण मार्गावर बंबावीपाडा येथे सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. सुप्रिया मंगेश पाटील असे गोळीबारीत जखमी झालेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा - नवी मुंबई : गांजा विकणाऱ्यावर कारवाई; ३ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त हेही वाचा - नवी मुंबई : आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे- राज्यपाल रमेश बैस उरण येथील कोप्रोली गावात सुप्रिया यांचे घर आहे. सुप्रिया या मंगळवारी त्यांच्या भावासोबत मोटारीने जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. सुप्रिया यांची मोटार अडवून हा हल्ला झाल्याने बांधकाम व्यावसायिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर मारेकरी गोळीबार करून तेथून पळून गेले. या गोळीबारीत सुप्रिया यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गोळी लागली. सुप्रिया यांच्या भावाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.