डिसेंबर अखेर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून वर्ष अखेर खवय्यांकडून थर्टी फर्स्टचे बेत आखण्यात येतात. यंदा करोना नंतर दोन वर्षाच्या दरम्यान आता सर्व निर्बंध हटवले असल्याने यंदाच्या थर्टी फर्स्ट पार्ट्या जल्लोषात साजऱ्या करण्यात येत आहे.  त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मांसाहाराची मागणी वाढली आहे. त्यातच कडाक्याची थंडीही पहावयास मिळत आहे . त्यामुळे सर्व स्तरातून माणस आहाराला मागणी वाढल्याने मासळीच्या दरात प्रति किलो ३०० ते ४०० रुपयांची दरवाढ झालेली आहे. मासांहारवर ताव मारणार्‍यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

हेही वाचा >>> वी मुंबई: दोनवेळा सरकारी अधिकाऱ्यांसमोर केली चोरी; अखेर पोलिसांनी ‘अशी’ केली अटक

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

बहुतांशी  उपवासामुळे मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार मागणी कमी होते. परंतु डिसेंबर अखेर मार्गशीर्ष महिन्याची सांगता झाली असून मांसाहार करणाऱ्यांची मागणी वाढलेली आहे. चिकन, मटन आणि मासळीची मागणी वाढत आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे.  गेल्या दोन वर्षे करोनामुळे सण उत्सव कोरोना नियमांच्या चौकटीत राहून साध्या पद्धतीने साजरे केले जात होते यंदाचा नाताळ आणि नवीन वर्ष स्वागत हे सन करोनामुक्त नियमातून साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी नागरिकांकडून मोठं मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे पार्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून त्याठिकाणी ही मासळी, मटण आणि चिकनचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे दर वाढ झाली आहे असे मत मासळी विक्रेता सोमनाथ कोळी यांनी व्यक्त केले आहे.

मासळी मध्ये पापलेट, सुरमई, आणि कोळंबी याला आधील पसंती दिली जाते. त्यामुळे यांच्या घाऊक दरात ३००-४०० रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सुरमई प्रतिकिलो ५००रुपयांनी उपलब्ध होती ती आता ७००-८०० रुपयांवर पोचली आहे . पापलेट हीमहागले आहेत तर कोळंबी ४००रुपयांवरून ६००-६५०रुपयांवर उपलब्ध आहे. सरते वर्ष आणि नवीन वर्ष स्वागत उत्सव या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांनी देखील मांसाहाराच्या मेनूमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच मांसाहार खवय्यांप्रेमींना मांसाहार ताव मारण्यासाठी  अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.