उरण : आदी मच्छिमारांचे पुनर्वसन करा, पोटावर मारू नका या मागणी घेऊन उरणच्या मच्छिमारांनी सिडकोच्या उरण बाह्यवळण रस्त्याचे काम बंद करून स्वतःला अटक करून घेतली. या मार्गामुळे येथील मासेमारी व्यवसायांवर परिणाम होणार असल्याचा दावा मच्छिमारांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नौदलाच्या वाहनांसाठी तयार करण्यात येणाऱ्या पर्यायी बाह्यवळण रस्त्याच्या कामाला मंगळवारी उरण कोळीवाडा येथील मच्छिमारांनी आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प ही मागणी करीत काम बंद पाडले. त्यामुळे, पोलिसांनी मच्छिमारांना अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात सिडकोकडून काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : प्रेम विवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

उरण हे नवी मुंबईमुळे वाढते शहर आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाढत्या औद्योगिक व नागरीकरणामुळे शहरातील वाहनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे उरण शहरात सध्या तासंतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरतील कोंडी दूर करण्यासाठी १९९५ पासून बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव आहे. तर नौदलाच्या मागणीमुळे सिडकोकडून उरण बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून ४७ कोटी खर्चाचा हा रस्ता आहे. त्यासाठी २०१३ ला सिडकोने सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या असल्याची माहिती सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांनी दिली आहे. तर मच्छिमारांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत चर्चा झाली असून, मच्छिमारांनी मोबदल्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याचा निकाल आल्यानंतर सिडकोकडून पूर्तता केली जाईल. तोपर्यंत काम सुरू करण्याची विनंती केली असल्याची माहिती दिली.

हेही वाचा – खांदेश्वरमध्ये शहरी ग्राहक शेतकऱ्यांशी जोडले जाणार, रायगड कृषी महोत्सवात दिडशे स्टॉल आकर्षण ठरणार

बाह्यवळण मार्गामुळे मच्छिमारी व्यवसायावर व येथील पर्यावरणावर ही परिणाम होणार असल्याने मच्छिमारांच्या पोटावर मारू नका, काम थांबवा, तसेच हरित न्यायालयाने या कांदळवन परिसरात काम करण्यास बंदी घातली असून, मच्छिमार व पर्यावरण वाचविण्याची मागणी मच्छिमारांचे नेते दिलीप कोळी यांनी केली. तर, पोलिसांनी मच्छिमारांना सरकारी कामात अडथळा केल्याने अटक केली आहे. त्यांच्यावर यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोर्ट विभागाचे सहायक आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fishermen stopped work on the uran bypass to demand rehabilitation ssb
First published on: 07-02-2023 at 17:31 IST