उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान|fishing boat on fire in karanja port fifty lakhs loss in uran navi mumbai | Loksatta

उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान

बोटीतील स्टो ने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बंदरावर उभ्या करण्यात येणाऱ्या मच्छिमार बोटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान
उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान

करंजा धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या मच्छिमार बोटीला मंगळवारी सकाळी आग लागली आहे. या आगीत संपूर्ण बोट जळून खाक झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बोटीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोटीतील स्टो ने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

करंजा येथील गजानन नाखवा यांच्या देवी पलसाई माता नावाच्या मच्छीमार बोटीला आग लागली आहे. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलामार्फत आग विझविण्यात आली आहे. मात्र आगीत मच्छिमार बोट जळून खाक झाली आहे. आशा प्रकारची घटना यापुर्वी ही करंजा बंदरावर घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बंदरावर उभ्या करण्यात येणाऱ्या मच्छिमार बोटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:56 IST
Next Story
नवी मुंबईत दीड लाखांची ई-सिगारेट पोलिसांकडून जप्त; बंदी असूनही मागणीत वाढ