प्रारूप विकास आराखडा बाबत आक्षेप घेत जनजागृतीची मागणी करत माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला .

हेही वाचा >>>नवी मुंबई : एपीएमसी फळ बाजाराची दुरवस्था

नवी मुंबई शहराचा प्रारूप विकास आराखडा ९ ऑगस्टला जाहीर झाला. आराखडा मध्ये अनेक त्रुटी असून मुखत्वे आराखडा मराठीत असावा , त्या बाबत जनजागृती प्रभाग निहाय करावी आणि मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत यांनी केली. तसेच या बाबत नवी मुंबई बचाव अंतर्गत जागर जनजागृतीचा हे अभियान आठ दिवस राबवले होते. या अभियानाचा शेवटी त्यांनी वाशीतील छ शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी आमदार गणेश नाईक यांनीही उपोषण स्थळी भेट देत नवी मुंबई भविष्य विकास आराखडा वर अवलंबून असताना त्यांनाच दूर ठेवले जात असल्याचा आरोप करीत अभियानाला पाठिंबा दिला. या वेळी विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शीवला.

हेही वाचा >>>उरण : पाणजे गावाचा रस्ता की जंगल मार्ग

दशरथ भगत (माजी विरोधीपक्ष नेता) जागर जनजागृती उपक्रमांतर्गत सात दिवस विविध नोड मध्ये जाऊन प्रारूप विकास आराखडा बाबत जनजागृती केली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १० हजार पेक्षा जास्त लोकांनी लेखी सहभाग नोंदवत आराखडा कळेल अशा मराठीतून असावा आणि त्या बाबत समजेल अशी माहिती द्यावी जेणेकरून हरकती व सुचना मांडू शकू हेच नमूद करण्यात आले आहे. उपोषण वेळी मनपा अधिकाऱ्यांनी भेट देत आमच्या मागण्या जाणून घेतल्या व सकारात्मकता दाखवली.