scorecardresearch

दूषित पाण्याने नागरिक हैराण, कोपरखैरणे परिसरात दुर्गंधयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा

शुद्ध तसेच पुरेसा पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

muddy water supply in koparkhairane
गेल्या काही दिवसांत नागरिकांना उलट्या, जुलाब, दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर १८ येथील श्री सि‌द्धेश्वर ओनर्स असोसिएशन आणि ओमसाई ओनर्स असोसिएशनमधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत नागरिकांना उलट्या, जुलाब, दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कावीळ,पोटदुखी सारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. शुद्ध तसेच पुरेसा पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्वतःच्या मालकीचे धरण म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेला ख्याती प्राप्त आहे. मात्र याच शहरात असलेल्या गावठाण आणि सिडको वसाहतीत दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. कोपरखैरणे से.१८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून दुषित शिवाय दुर्गंधी युक्त पाणीपुरवठा होत आहे. बऱ्याच ठिकाणी जलवाहिन्या या भूमिगत भागात आहेत. तसेच काही जलवाहिन्या या नाले गटारे यांच्या बाजूने गेलेल्या आहेत, तर काही जलवाहिन्या मालिनीसारण वाहिन्यांजवळून गेल्या आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक ६१५ कोटीची विक्रमी मालमत्ताकर वसूली

या ठिकाणी काही जलवाहिन्यांना गळती असल्याने या गटारातील अस्वच्छ पाणी त्यात मिसळत आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छ पाणी पुरवठा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. हे दुर्गंधी युक्त दूषित पाणी पिल्याने नागरिकांना कावीळ, जुलाबाचा त्रास होत असल्याचे मत रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नवी मुंबई महानगर पालिका पाणी पुरवठा विभागामार्फत योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोपरखैरणे सेक्टर १८ येथे गेले काही दिवसांपासून दूषित तसेच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरच दूषित पाणी पुरवठा का होत आहे? याचा शोध घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा. याआधी एक तास पाणी येत होते, मात्र आता केवळ अर्धा तासच पाणी मिळत असून अपुरा पाणीपुरवठा होता आहे, तो ही सुरळीत करावा. अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 14:40 IST

संबंधित बातम्या