scorecardresearch

नवी मुंबई: गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एसएससी सराव परीक्षा उपक्रमाचा शुभारंभ

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी सराव परीक्षेला दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात.

नवी मुंबई: गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एसएससी सराव परीक्षा उपक्रमाचा शुभारंभ
गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एसएससी सराव परीक्षा उपक्रमाचा शुभारंभ

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एसएससी बोर्डाच्या धर्तीवर असलेल्या सराव परीक्षेचा नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. सराव परीक्षेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे असलेले मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वतःच्या दहावीत असतानाच्या आठवणी सांगितल्या. तसेच विज्ञान शाखेत फारशी इच्छा नसताना दहावीत उत्तम गुण मिळवल्याने सर्वांनी सांगितले म्हणून प्रवेश घेतला. वास्तविक तेव्हाच कला शाखेत प्रवेश घेतला असता तर २० वर्षांपूर्वीच प्रशासकीय सेवेत रुजू झालो असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे हे ठरवून मार्गक्रमण करा असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

हेही वाचा- नवी मुंबई: जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगत्व आणि स्वच्छतेविषयी वॉकेथॉनव्दारे जनजागृती

१९९८ साली सराव परीक्षा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती नाहीशी करून मुख्य परीक्षेला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि उत्तम यश संपादित करावे. आजपर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली.

हेही वाचा- ‘त्या’ कर्तव्यदक्ष पोलिसाच्या अवयवदानामुळे मिळाले दोघांना जीवदान

९०० विद्यार्थी आणि दोन परीक्षा केंद्र यापासून सुरू झालेली एसएससी सराव परीक्षेला दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी २८ परीक्षा केंद्र आणि तब्बल ७२ शाळांचा समावेश आहे.‌ मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन माध्यमातून सर्व विषयांसाठी घेतली जाणारी ही परीक्षा महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा आहे. ४०० तज्ञ शिक्षकांचा संच ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतो. परीक्षा केंद्रे हॉल तिकीट वाटप प्रश्नपत्रिका तयार करणे प्रश्नपत्रिका तपासणे मॉडरेशन करणे अशा सर्व बाबींचा अनुभव बोर्डाच्या धरतीवर या सराव परीक्षेमध्ये मिळत असतो. अशी माहिती संस्थेचे सचिव संदीप नाईक यांनी दिली.यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणांचा स्कोर वाढविणारे स्पीड रिविजन ॲप चे विनामूल्य वितरण यावर्षी देखील ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात, वेळेचे नियोजन कसं करावं, करिअर मार्गदर्शन अशी उपयुक्त माहिती आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 22:09 IST

संबंधित बातम्या