नवी मुंबई: पावसाळा सुरू झाला असून एपीएमसी कांदा बटाटा बाजारात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले निदर्शनास येत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी  पाहावयास मिळत आहे. बाजारातील खराब कांदा, पालापाचोळा याचा कचरा असतो, मात्र आता सलग दोन दिवसाच्या पावसाने बाजारात काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात कचरा होत असून याठिकाणी दुर्गंधी पसरून याचा नाहक त्रास येथील बाजार घटक, ग्राहकांना होत आहे. याठिकाणी नियमितपणे कचरा उचला जात नाही,त्यामुळे पावसाळ्यात अशी दुर्गंधी पसरली आहे,  येथील सफाई नियमित व्हावी असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

नागरिक आणि रस्त्यावरुन जाणारे पादचारी यांना नाक मुठीत घेऊन चालावे लागत आहे. पावसाळा सुर असून यामध्येच अशा दुर्गंधी वातावरणाने अनेकांना साथीच्या रोग होण्याची भिती आहे.  साचलेला कचरा आणि पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि खऱ्या अर्थाने साथीच्या रोगांची लागण होते. पावसाळ्यमुळे या रस्त्यावरील कचरा पाण्याने वाहून गटारे जास्त तुंबण्याची भीती आहे. कचऱ्याची नियमित उचल नाही, त्यामुळे कांदा बटाटा आवारात बकालवस्था आली आहे.  निदान पावसाळ्याचे चार महिने येथील कचरा नियमित उचलावा अशी मागणी होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage in apmc onion market navi mumbai amy
First published on: 12-06-2024 at 18:53 IST