scorecardresearch

नवी मुंबई : एपीएमसीत गावठी संत्रा, मोसंबीची आवक कमी; दरात वाढ

एपीएमसीमध्ये सर्व हंगामात मद्रासची मोसंबी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. नोव्हेंबर- डिसेंबर पासून बाजारात गावठी संत्री मोसंबी दाखल होते.

नवी मुंबई : एपीएमसीत गावठी संत्रा, मोसंबीची आवक कमी; दरात वाढ
एपीएमसीत गावठी संत्रा, मोसंबी आवक कमी

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती घाऊक फळबाजारात अंजीर , स्ट्रॉबेरी आवक वाढली आहे. परंतु गावठी संत्री-मोसंबी आवक कमी झाली आहे. बाजारात सध्या ५ गाडी आवक होत आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : वाशी विभागात एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस

एपीएमसीमध्ये सर्व हंगामात मद्रासची मोसंबी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. नोव्हेंबर- डिसेंबर पासून बाजारात गावठी संत्री मोसंबी दाखल होते. मद्रासची मोसंबी हि आकाराने मोठी व चवीला आंबट असते. अशी मोसंबी जास्तीस्त जास्त रसाकरीता वापरली जाते. मात्र नागपूरची गोड मोसंबी नागरिक आवडीने खात असतात.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागताला व सरत्या वर्षाच्या निरोपाला वाहतूक पोलीस रात्रभर रस्त्यावरच

तसेच परदेशी संत्री ही आकाराने मोठी असून चवीला गोड नसते,परंतु गावठी संत्री आकाराने लहान तसेच रसरशीत असते. परंतु ग्राहकांच्या मागणी नुसार बाजारात गोड मोसंबीची आवक कमी प्रमाणातच होत असते. बाजारात नागूपरची मोसंबी दाखल होताच त्या मालाचा उठाव लगेच होतो. संत्र- मोसंबीच्या एकूण ४०-५० गाड्या दाखल होत असतात,पंरतु आता बाजारात आज गुरुवारी अवघ्या ५ गाड्या दाखल झाल्या असून दर वाढले आहेत. संत्राची ३ तर मोसंबीच्या २ गाडी दाखल झाल्या आहेत. आधी मोसंबी च्या दरात २० ते ४०रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो ६०-८०रुपये तर आता ८०-१२० रुपयांनी विक्री होत आहे. संत्रीच्या दरात १००-२०० रुपयांची वाढ झाली असून ८ डझनला आधी ८००-१२०० रुपये तर आता ९००-१४०० रुपयांनी उपलब्ध आहे. तर स्ट्रॉबेरी आवक वाढली असून नाशिक आणि महाबळेश्वर येथील ४हजार क्रेट दाखल होत आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे दर कमी झाले आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 18:46 IST

संबंधित बातम्या