महापालिका मुख्यालयात सामान्यांना मर्यादित वेळेत प्रवेश

नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी करोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली आहे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी ३ ते ६ या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. पहिल्याच दिवशी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर यावरून वाद झाले. अखेर अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मध्यस्थी केल्यानंतर अभ्यागतांना आत सोडण्यात आले.

नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी करोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात महापालिका मुख्यालयासाठीही नियमावली करण्यात आली आहे. महापालिकेत अभ्यागतांना अधिकारी वर्गाला भेटण्यासाठी दुपारी ३ ते ६ असा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयात याआधी कोणीही येऊन आंदोलने, निदर्शने करीत होते, याचा त्रास प्रशासनाला होत असे. यामुळे नवी नियमावली करण्यात आली आहे. मात्र गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळी प्रवेशद्वारावर आलेल्या नागरिकांना सुरक्षारक्षकांनी अडवले. त्यामुळे सुरक्षारक्षक व नागरिक व ठेकेदार यांच्यात वाद झाले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मध्यस्थी करून नागरिकांना शांत करीत त्यांना प्रवेश देण्यात आला.

मुख्यालयात कोणीही कोणत्याही वेळी येत असते. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर परिणाम होता. कामे रेंगाळत होती. तसेच करोनाच्या अनुषंगानेही गर्दी होऊ नये म्हणून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.  -संध्या अंबादे, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: General time access to municipal headquarters akp

Next Story
रुपगर्वितेचे ‘इंग्लिश व्हिंग्लीश’
ताज्या बातम्या