नवी मुंबई : अभ्यासाचा तगादा लावल्याच्या रागातून आईची गळा आवळून हत्या केलेल्या  मुलीची न्यायालयाने बुधवारी बालसुधारगृहात रवानगी केली .

ही घटना ३० जुलै रोजी ऐरोली येथे घडली होती. ही मुलगी आपल्या आईने आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर आत्महत्या नसल्याचे समोर आले आणि मुलीने पोलिसांसमोर कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी मुलगी अल्पवयीन असल्याने तिला अटक केली नव्हती.  बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सदर अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली.