नवी मुंबई : क्रेडीट कार्डचे लिमिट वाढवण्यात आल्याचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. फोन करून बँक डिटेल्स घेत समंधीत क्रेडीट कार्ड मधील सर्व पैसे आपल्या खात्यात जमा केले गेले असून एका महिलेची १ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक झाली. अज्ञात व्यक्तीला ओटीपी देणे सदर महिलेस महागात पडले आहे.बँक आणि  पोलीस विभागातर्फे अनेकदा अज्ञात व्यक्तीला “ओटीपी वा आपली बँक डीटेल्स देऊ नका” म्हणून सर्वांनाच सुचना दिल्या जातात. तसेच या बाबत प्रसिद्धी माध्यमातूनही सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र अशा सुचानाकडे डोळेझाक केल्याने ऑन लाईन आर्थिक फसवणूक करणार्यांचे फावते. खारघर येथे राहणाऱ्या एका महिलेने काही महिन्यापूर्वी ऑन लाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे क्रेडीट कार्ड काढले. या कार्ड वर जास्तीत जास्त एक लाख सत्तावांना हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती. १९ तारखेला सदर महिलेस एक अज्ञात फोन आला आणि त्याने तुमच्या क्रेडीट कार्ड मर्यादा वाढवण्यात येत आहे असे सांगत क्रेडीट कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली.

हेही वाचा : ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे भवितव्य अंधारात? ; अपुऱ्या मनुष्यबळाची गंभीर दखल; जागतिक बँकेकडून ऑक्टोबपर्यंत मुदत

त्या व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितल्याने सर्व डीटेल्स फिर्यादी महिलेने दिले. शेवटी त्याने ओटीपी मागितला आणि फिर्यादी महिलेने दिलाही. काही वेळातच क्रेडीट कार्ड मधून खर्चाची मर्यादा न वाढता त्यातून ९८ हजार आणि ५६ हजार से दोन वेळा पैसे काढून ते अन्यत्र वळवण्यात आले.  असा संदेशही त्यांना आला. हि प्रक्रिया पार पडल्या नंतर त्या व्यक्तीने  फोन बंद केला. जो आज तागायत बंदच आहे. फोन वारंवार बंद येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शुक्रवारी खारघर पोलीस ठाण्यात फोन वर बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giving otp to unknown person is costly fraud of woman 1 lakh 54 thousand rupees navi mmumbai tmb 01
First published on: 24-09-2022 at 10:16 IST