scorecardresearch

महालक्ष्मी सरसरमध्ये खापरावरील पुरणपोळीचा थाट न्यारा, पुरणपोळीच्या विक्रीतून चांगली कमाई

नवी जागृती स्वयं सहाय्यता समुह  जिल्हा धुळे येथील कळंभीर साक्री येथील बचतगटाच्या स्टॉलवरील पुरणपोळीने चांगला भाव खाल्ल्याचे पाहायला मिळाले.

Good income from sale of Puranpoli
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवी मुंबई: वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात भरविण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून स्टॉल धारकांना मुंबईसारखा प्रतिसाद नवी मुंबईत मिळाला नसला तरी विविध भागातून आलेल्या महिलांच्या चविष्ट पदार्थांचा नागरीकांनी चांगलाच आस्वाद लुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विविध भागात लोकप्रिय असलेल्या पुरणापोळीचा आस्वाद अनेकांनी घेतला. शहरात होणाऱ्या पुरणपोळीपेक्षा खापरावरील तुपातील पोळीवर अनेकांनी ताव मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नव जागृती स्वयं सहाय्यता समुह  जिल्हा धुळे येथील कळंभीर साक्री येथील बचतगटाच्या स्टॉलवरील पुरणपोळीने चांगला भाव खाल्ल्याचे पाहायला मिळाले. खापरलावर भाजलेली भली मोठी पोळी व त्यावर  साजूक तुपाची भर यामुळे १०० रुपयाला एकपोळी असा दर असतानाही खवैत्यांनी मात्र या पुरणपोळीवर चांगलाच ताव मारल्याचे चित्र पाहाया मिळाले. या प्रदर्शनात जवळजवळ ५०० पेक्षा अधिक पोळ्यांची विक्री या महिलांनी केली असून विशेषतः ज्येष्ठ नागरीक असलेल्या येथील महिलांच्या त्रिकुटाचे सर्वच खवैय्यांनी कौतुक केले आहे.

८ मार्च डिसेंबर ते १९ मार्च २०२३ या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १ दिवसाने हे प्रदर्शन वाढवण्यात आले होते. सोमवारी या प्रदर्शनाची सांगता करण्यात आली  दरवर्षी मुंबईत  बांद्रा येथे होणारे हे प्रदर्शन नवी मुंबईत पहिल्यांदाच भरविण्यात आले होते. सुट्टीच्या दिवशी नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला असून महालक्ष्मी सरस सारखा प्रतिसाद मिळाला नसला तरी प्रथमच नवी मुंबईत झालेल्या प्रदर्शनाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद होता.  प्रदर्शनाचा एक दिवस वाढवल्याने  महाराष्ट्राबाहेरील स्टॉलधारकांचे आधीच तिकीट काढले असल्याने अनेकांनी सोमवारी या प्रदर्शनात भाग घेतला नाही.

महाराष्ट्राच्या व विविध राज्यातील स्टॉलमध्ये  शनिवारी व रविवारी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून या प्रदर्शनाची मुदत आज सोनवारी २० मार्चपर्यंत होती.या या प्रदर्शनाला आतापर्यंत लाखो नागरिकांनी भेट दिली असून  खान्देशी  जेवणाचा आस्वाद नागरीकांनी घेततला . धुळे जिल्ह्यातील  साक्री तालुक्यातील कळंभीर गावच्या  या महिलांच्या स्टॉलवर  खापरेवरील पुरणपोळी ,वांग्याचे भरीत भाकर ठेचा, शेव भाजी भाकर भरीत, शुणका भाकर ठेचा, हुरड्याचे थालीपीठ  भरलेली वांगी भाजी भाकर ठेचा व  खापरेची पुरणपोळी व त्यावर शुद्द तुपाचा साज असे पदार्थ बनवून दिले जाते होते. त्यामध्ये  सुलोचना ठाकरे, सखुबाई पाटील रंजना ठाकरे या वयस्क असलेल्या महिला पण कामाचा उरक व पुरणपोळी बनवण्याची व फिरवण्याची पध्दत पाहून अनेकजन अंचंबित होत असत. त्यामुळे या खापरावरील तुपातील पुरणपोळीचा तोरा काही औरच असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी या महिलांनी दरवर्षीपेक्षा नागरीकांचा प्रतिसाद कमी असला तरी पुरणपोळीला मात्र छान प्रतिसाद मिळाल्याची माहिती येथील महिलांनी दिली. 

महालक्ष्मी प्रदर्शनात खापरावरील साजुक तुपातल्या ४०० पेक्षा अधिक पेळ्यांची विक्री….

खापरावरील पुरणपोळीला नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. खापरावरील पोळी नागरीकांना आवडत होती. त्यामुळे पोळांच्या विक्रीतून चांगले पैसे मिळाले. पण मुंबईतील प्रदर्शनापेक्षा या प्रदर्शनात थोडा कमी प्रतिसाद मिळाला.

-सुलोचना ठाकरे, स्टॉलधारक महिला

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:46 IST

संबंधित बातम्या